Home /News /entertainment /

HBD : जाहिरातीतून मिळाली होती प्रसिद्धी; पाहा दिशा पाटनीचा अभिनय प्रवास

HBD : जाहिरातीतून मिळाली होती प्रसिद्धी; पाहा दिशा पाटनीचा अभिनय प्रवास

अल्पावधीत लोकप्रिय ठरली दिशा पाटनी (Disha patani). अशी केली होती करिअरला सुरुवात.

  मुंबई 13 जून : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री अशी दिशा पाटनीची (Disha Patani) ओळख बनली आहे. अल्पावधीतच तिने तुफान लोकप्रियता मिळवली. तिचा मोठा चाहता वर्गही आहे. दिशाने मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला तिने काही जाहिरातींमध्येही काम केलं होतं. दिशाचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तराखंड इथं झाला होता. बरेलीत (Bareily) तिचं बालपण गेलं. दिशाचे वडिल एक पोलीस अधिकारी आहेत. तर आई हेल्थ इन्स्पेक्टर आहे. दिशाला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ देखील आहेत. बहीण खुशबू ही सैन्यात आहे. पण दिशाने मात्र वेगळी वाट निवडत अभिनेत्री व्हायचं ठरवलं. दिशाने मॉडेलिंग आणि काही जाहीरातींत काम केल्यानंतर साऊथ फिल्मसाठी ऑडिशन द्यायाला सुरुवात केली. 2015 साली तिने लोफर (Loafer) या दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं. त्यातूनही तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) 'बेफिक्रे' या म्युझिक व्हिडीओत दिसली होती. हा म्युझिक अल्बम देखील हीट ठरला होता. तेव्हा तिची टायगरशी चांगली मैत्री झाली होती.
  यानंतर दिशाला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. निरज पांडे यांच्या 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात ती दिसली यानंतर दिशाने अगदी काहीच काळात मोठा चाहता वर्ग निर्माण केला. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. तिच्या चाहत्यांनी तिला नॅशनल क्रश म्हणूनही घोषित केलं.

  ‘Dhoom 4’ मध्ये सलमान - अक्षयची जोडी झळकणार? ट्वीट्स Viral

  दिशाने 'कु फू योगा' या चिनी चित्रपटातही काम केलं आहे. यानंतर दिशाने अनेक हिट चित्रपट दिले. ज्यात 'बागी 2', 'बागी 3', 'भारत', 'मलंग', 'राधे' या चित्रपटांचा समावेश आहे. लवकरच ती 'एक विलन रिटर्न्स', 'केटीना' या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशाच्या नात्याच्या चर्चा अनेकदा चाहत्यांमध्ये रंगताना दिसतात. तर ते दोघंही अनेकदा एकत्र स्पॉटदेखील होतात. एकत्र ट्रिप्सही करतात. पण त्या दोघांनी कधीही आपलं नात जाहीर केलं नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Disha patani, Entertainment

  पुढील बातम्या