मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नासाठी राजेश खन्ना यांनी घातली होती ही अट; अखेर डिम्पल कपाडिया झाल्या वेगळ्या

लग्नासाठी राजेश खन्ना यांनी घातली होती ही अट; अखेर डिम्पल कपाडिया झाल्या वेगळ्या

अट मान्य न केल्याने डिम्पल आणि राजेश खन्ना वेगळे राहत होते.

अट मान्य न केल्याने डिम्पल आणि राजेश खन्ना वेगळे राहत होते.

अट मान्य न केल्याने डिम्पल आणि राजेश खन्ना वेगळे राहत होते.

  • Published by:  News Digital

मुंबई 8 जून: एकेकाळी सिनेसृष्टीची सुपरहीट राहिलेली अभिनेत्री डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) यांचा आज जन्मदिवस (Dimple Kapadia birthday). डिम्पल यांचा जन्म मुंबईत एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील चुनीभाई कपाडिया हे अनेक फिल्मी स्टार्सचे मित्र होते. अनेकदा ते या स्टार्सना त्यांच्या पार्टीत बोलवायचे. एकदा राज कपूर (Raj Kapoor) कपाडिया यांच्या पार्टीला आले असता त्यांनी डिम्पल यांना पाहिलं आणि आपल्या चित्रपटात घेण्याचा विचार केला.

राज कपूर यांनी डिम्पलला ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत चित्रपटात ब्रेक दिला. त्यावेळी त्या फक्त 15 वर्षांच्या होत्या. पण चित्रपटांपूर्वीच डिम्पल यांची भेट राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्याशी झाली होती. त्या राजेश खन्ना यांच्या प्रेमात होत्या. सुरूवातीला त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे राजेश खन्ना हे डिम्पल यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते.

त्या वेळेच्या काही वृत्तानुसार एका समुद्रकिनारी राजेश यांनी डिम्पल यांनी प्रपोझ केलं होतं. व डिम्पलने देखील लगेच लग्नाला होकार दिला होता. राजेश यांचा वयाचा डिम्पल वर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यांनी विवाह केला. पण राजेश खन्नांनी डिम्पलला लग्नाआधी एक अट घातली होती. ती म्हणजे लग्नानंतर चित्रपटात काम न करण्याची.

HBD : Fitness queen शिल्पा शेट्टीने जाहिरातीतून केली करिअरला सुरुवात; आज आहे कोट्यवधींची मालकीन

विवाहा नंतर डिम्पल यांनी काही दिवस चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यांना ट्विंकल आणि रिंकल या देन मुली देखील झाल्या. पण त्यांना चित्रपटांत काम करण्याची इच्छा होती. यामुळे राजेश आणि डिम्पल यांच्यात मतभेद वाढू लागले. 1982 साली डिम्पल या राजेश यांच्यापासून वेगळ्या राहू लागल्या. त्यानंतर त्यांनी काही चित्रपटांत कामही केलं. 1984 साली त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक केलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Entertainment