Birthday Special : साक्षीच्या आधी महेंद्रसिंग धोनीनं ‘या’ अभिनेत्रींना केलंय डेट

Happy Birthday Dhoni : साक्षीशी लग्न करण्याआधी धोनीचं नाव बॉलिवूडच्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 09:43 AM IST

Birthday Special : साक्षीच्या आधी महेंद्रसिंग धोनीनं ‘या’ अभिनेत्रींना केलंय डेट

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 38 वा वाढदिवस. करिअरच्या सुरुवातीतच्या काळात धोनी जेवढा मैदानात गाजला तेवढाच तो मैदानाच्या बाहेरही त्याच्या अफेअर्समुळे तेवढाच चर्चेत राहीला.

क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्यातील नातं आता कोणालाच नवीन नाही. भारताय संघांतील अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केलं आहे. यात धोनीचंही नाव घेतलं जातं. साक्षीशी लग्न करण्याआधी धोनीचं नावही बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

2007 मध्ये धोनी स्वतःहून दीपिका पदुकोण त्याची क्रश असल्याचं मान्य केलं होतं. एवढंच नव्हे तर दीपिकाला लांब केस असलेली मुलं आवडत नाहीत म्हणून धोनीनं त्याचा हेअर कट बदलला असंही म्हटलं जातं. त्यानं दीपिकाचा सिनेमा ओम शांति ओमच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही हजेरी लावली होती. तसेच त्यानं दीपिकाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी20 क्रिकेट सामन्यासाठी निमंत्रणही दिलं होतं आणि विशेष म्हणजे दीपिका सुद्धा या सामन्यात टीम इंडियाला चिअरअप करताना दिसली होती.

महेंद्रसिंग धोनी आणि कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोज यांच्या लिंकअपच्या चर्चा बॉलिवूड सुरु होत्या मात्र या दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी नेहमीच मौन बाळगलं. प्रीती त्यावेळी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ची क्रिएटीव्ह डायरेक्टर होती.

2009मध्ये धोनीचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी राय सोबत जोडलं गेलं होतं. लक्ष्मीनं ते दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचंही मान्य केलं होतं मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Loading...

 अभिनेत्री असीन सोबतही धोनीचं नाव जोडलं गेलं होतं. हे दोघंही एका प्रसिद्ध फॅशन ब्रँडचे अ‍ॅम्बेसिडर होते. त्यावेळी धोनी साक्षीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांचा साखरपुडाही झाला होता. 2010च्या आयपीएल सेमी-फायनल अगोदर धोनी असीनच्या लोखंडवाला अपार्टमेंट बाहेर स्पॉट झाला होता. त्यामुळे त्यांची सगळीकडे खूप चर्चाही झाली होती. एवढंच नव्हे तर 2011मध्ये श्रीलंका येथे झालेल्या एका इव्हेंटमध्येही हे दोघं एकत्र दिसले होते. पण असीननं मी फक्त त्याचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते असं स्पष्ट केलं

2010मध्ये धोनीनं साक्षी रावत सोबत लग्नगाठ बांधली. आता साक्षी आणि धोनीला झीवा नावाची एक गोड मुलगी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...