एका अफवेमुळे बदललं धनुषचं आयुष्य, असा झाला सुपस्टार रजनीकांत यांचा जावई

एका अफवेमुळे बदललं धनुषचं आयुष्य, असा झाला सुपस्टार रजनीकांत यांचा जावई

Happy Birthday Dhanush : एका सिनेमाच्या स्क्रिनिंगनंतर त्या थिएटरच्या मालकानं धनुषची ओळख ऐश्वर्याशी करून दिली होती.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : ‘कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या साउथ स्टार धनुषचा आज 36 वा वाढदिवस. आपल्या कौशल्याच्या बळावर इंटरनॅशनल स्टार बनलेल्या या अभिनेत्याला हे यश मिळवायला मात्र बरीच मेहनत घ्यावी लागली. बॉलिवूड सिनेमा ‘रांझना’मध्ये कुंदन बनून सर्वांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याची लव्ह स्टोरीही तेवढीच इंटरेस्टिंग आहे. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. पण रजनीकांत याची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचं लग्न मात्र एका अफवेमुळे झालं आणि एक साधारण असा मुलगा सुपरस्टारचा जावई झाला.

धनुषचं खरं नाव वेंकटेश प्रभू कस्तूरी राजा आहे. धनुष फक्त अभिनेताच नाही तर प्रोड्यूसर, साँग रायटर आणि प्लेबॅक सिंगर सुद्धा आहे. ‘आदुकलम’ या सिनेमासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट  अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. सध्या धनुष साउथ मधील आघाडीचा अभिनेता मानला जातो मात्र त्याची लव्ह स्टोरी सर्वांपेक्षा वेगळी आहे.

भर पावसातही मलायका निघाली योगा क्लासला, दिसला नो मेकअप लुक

 

View this post on Instagram

 

எங்களின் அன்பு அண்ணி #aishwaryardhanush அவர்களுக்கு இனிய பிறந்தநாள் வாழ்த்துக்கள் வாழ்க வளமுடன் 😘 @dhanushkraja

A post shared by Eppavum Padikadhavan 😎 🔥 (@sathishdfan) on

एक अफवा आणि रजनीकांतच्या मुलीशी लग्न

सर्वांनाच माहीत आहे की, धनुषची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत ही  साउथ सिने इंडस्ट्रीतील थलायवा रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचं लग्न 2004मध्ये झालं आहे. मात्र त्यांच्या लग्नाची स्टोरी खूपच फिल्मी आहे. त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली आणि मग लग्न कसं झालं याविषयी एक मुलाखतीत स्वतः धनुषनं खुलासा केला होता.

Box Office : Judgemental hai kya सिनेमाला पहिल्याच दिवशी मिळाले 'इतके' कोटी

धनुष म्हणाला, मी माझ्या कुटुंबासोबत 'काढाल कोंडे'  हा माझा सिनेमा पाहायला गेलो होतो. सिनेमा संपल्यानंतर त्या थिएटरच्या मालकानं माझी ओळख रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या यांच्याशी करून दिली. पण त्यावेळी आमचं बोलणं ‘हाय-बाय’ पर्यंतच झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ऐश्वर्याकडून एक बुके मिळाला. ज्यासोबत एक नोट होती. त्यात लिहिलं होतं. ‘गुड वर्क, संपर्कात राहा.’

War मधील या HOT बिकिनी बॉडीसाठी वाणीनं घेतली होती अशी मेहनत, शेअर केलं सिक्रेट

यानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांच्यातील बोलणं वाढत गेलं आणि ही गोष्ट मीडिया पर्यंत पोहोचली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. त्यामुळे या सर्व अफवा रोखण्यासाठी दोघांच्याही कुटुंबीयांनी विचार केला आणि मग धनुष-ऐश्वर्याच्या लग्नाची घोषणा करण्यात आली. ऐश्वर्या धनुषपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. धनुषनं जेव्हा ऐश्वर्याशी लग्न केलं त्यावेळी तो फक्त 21 वर्षांचा होता तर  ऐश्वर्या 23 वर्षांची होती.

========================================================

VIDEO: 15 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 10:05 AM IST

ताज्या बातम्या