Happy Birthday Deepika : तुमच्या Playlist मध्ये असायलाच हवीत अशी 5 अप्रतिम गाणी

Happy Birthday Deepika : तुमच्या Playlist मध्ये असायलाच हवीत अशी 5 अप्रतिम गाणी

दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) चित्रपटातील अनेक गाणी गाजली आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशी टॉप 5 गाणी सांगणार आहोत जी ऐकून तुमचा मूड खराब असला तरी तो चांगला होईल.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण( Deepika Padukone) तिचा आज वाढदिवस आहे. ती सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेंत्रींपैकी एक आहे. तिने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती नेहमीच लाइमलाइटमध्ये राहत असते. रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) तिने लग्न केल्यानंतर हे कपल जास्तच चर्चेत असते. आज दीपिका आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'ऐश्वर्या' या कन्नड सिनेमातून तिने आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 2007 मध्ये ओम शांती ओम (Om Shanti Om) या चित्रपटातून तिने शाहरुख खान (Shahrukh khan) बरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मागील 14 वर्षांमध्ये ती आघाडीची अभिनेत्री झाली असून आतापर्यंत तिने चेन्नई एक्स्प्रेस, ओम शांती ओम, ये जवानी है दिवानी यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये तिची गाणी देखील खूप लोकप्रिय झालीआहेत. आज तिच्या वाढदिवशी आपण तिच्या अशाच 5 गाण्यांवर नजर टाकणार आहोत.

1)Main Agar Kahoon (2007)

   ओम शांती ओम(Om Shanti Om) या चित्रपटातील हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. दीपिका पदुकोणच्या पदार्पणाच्या चित्रपटात शाहरुख खान, अर्जुन रामपाल आणि श्रेयस तळपदे यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात हे गाणे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले असून विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलं आहे तर गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत.

2)Tumhi Ho Bandhu (2012)

  कॉकटेल(Cocktail) या चित्रपटातील हे गाणे देखील त्यावेळी खूप लोकप्रिय झाले होते. आजही अनेकजण हे गाणे आवडीने ऐकतात. सैफ अली खान, डायना पॅंटी आणि दीपिका  चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. कविता सेठ आणि नीरज श्रीधर यांनी गायलेल्या या गाण्याला संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केले होते. इर्शाद कामिल यांनी याचे बोल लिहिले आहेत.

3)Badtameez Dil (2013)

  हे गाणे आजही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. 2013 मध्ये आलेल्या ये जवानी है दिवानी (Yeh Jawani Hai Diwani) या चित्रपटातील हे गाणे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर शूट करण्यात आले होते. बेनी दयाल आणि शेफाली अल्व्हारेस यांनी हे गाणे गायले असून प्रीतम यांनी संगीत दिले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

4)Nagada Sang Dhol (2013)

   गोलियां की रासलीला राम-लीला (Ram Leela) या चित्रपटातील हे गाणे आठ वर्षांनंतरही खूप लोकप्रिय आहे. श्रेया घोषाल आणि ओस्मान मीर यांनी हे गाणे गायले होते. संगीत स्वतः दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिले होते. तर सिद्धार्थ - गरिमा यांनी हे गाणे लिहिले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

5)Ghoomar (2018)

  संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत(Padmawat) या चित्रपटातील हे गाणे आजही आवडीने ऐकले जाते. श्रेया घोषाल आणि स्वरूप खान यांनी हे गाणे गायले असून ए. एम. तुराझ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: January 5, 2021, 11:33 AM IST

ताज्या बातम्या