मुंबई, 05 जानेवारी : बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आत्ताची सर्वात टॉपची हिरोईन आहे. हे स्थान गाठण्यासाठी दीपिकाला प्रचंड मेहनत करावी लागली आहे. अनेक वर्ष स्ट्रगल करुन तिला पहिला सिनेमा मिळाला होता. देशातच काय तर जगभरात दीपिकाचे बरेच चाहते आहेत. दीपिका आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
आजची बॉलिवूडची टॉप अभिनेत्री एकेकाळी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली होती. दीपिकासारखी मुलगी आपल्या आयुष्यात असावी असा विचार करणारे हजारो तरुण आहेत. पण दीपिकाला मात्र प्रेमामध्ये प्रतारणा सहन करावी लागली होती. काही वर्षांपूर्वी रणबीर कपूर आणि तिच्या रिलेशनची जोरदार चर्चा सुरू होती. ते दोघं लवकरच लग्न करतील असं चाहत्यांना वाटू लागलं होतं. दीपिका RK असं लिहीलेला टॅटूही काढून घेतला होता. पण त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आणि चाहत्यांना धक्काच बसला.
दीपिकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना मनमोकळेपणाने सारं काही सांगितलं. रणबीरचं नाव न घेता तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘मला रिलेशनमध्ये धोका मिळाला होता. माझ्यासोबत रिलेशनमध्ये असताना त्याने आणखी एका व्यक्तीसोबत नातं जोडलं होतं. जे मी स्वत:च्या डोळ्याने पाहिलं’.
ब्रेकअपचा तिच्या मनावर प्रचंड नकारात्मक परिणाम झाला होता. जवळजवळ 6 महिने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. पण जिद्द न हरता तिनं स्वत:ला यातून बाहेर काढलं आणि इंडस्ट्रीमध्ये जोरदार कमबॅक केला.रणवीर सिंगसोबत तिचं लग्न झालं आहे. बॉलिवूमधील सर्वात उत्तम कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं.