Happy Birthday: जूही चावलाशी लग्न करायचं होतं सलमानला, पण असं काही झालं की...

जूही चावलाने आपल्या करियरच्या अगदी पीक पॉईंटवर असताना 1996 मध्ये जय मेहताशी लग्न केलं. त्यावेळी हे लग्न अतिशय गुपचूप झालं होतं. याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हतं.

जूही चावलाने आपल्या करियरच्या अगदी पीक पॉईंटवर असताना 1996 मध्ये जय मेहताशी लग्न केलं. त्यावेळी हे लग्न अतिशय गुपचूप झालं होतं. याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हतं.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla) आज तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. जूही चावलाच्या वाढदिवसानिमित्त काही चर्चांना पुन्हा उधान आलं आहे. जूही चावलाने जय मेहताशी लग्न केलं आहे. पण सलमान खानला (Salman Khan) जूही चावलाशी लग्न करायचं होतं. एवढंच नाही, तर सलमानने जूही चावलाच्या वडिलांशी याबाबत बोलणीही केली होती. सलमानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यात सलमानने याबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. या जुन्या व्हिडिओमध्ये सलमानने सांगितलं की, जूही अतिशय चांगली आहे. मी तिच्या वडिलांशी, जूहीशी लग्न करण्याबाबतही विचारलं होतं, परंतु त्यांनी यासाठी नकार दिला. जूही चावलाने आपल्या करियरच्या अगदी पीक पॉईंटवर असताना 1996 मध्ये जय मेहताशी लग्न केलं. त्यावेळी हे लग्न अतिशय गुपचूप झालं होतं. याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हतं.
  View this post on Instagram

  A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

  जूही चावलाने एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जय मेहताशी तिची ओळख झाली होती. पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाल्यानंतर त्यांच्यात काहीही बोलणं नव्हतं. काही वर्षांनंतर, मित्रांनी ठेवलेल्या डिनर पार्टीवेळी जूही पुन्हा जय मेहतांना भेटली. त्यानंतर त्यांच्यात बोलणं सुरू झाल्याचं जूहीने सांगितलं.
  View this post on Instagram

  A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

  जूहीच्या एका वाढदिवशी जय मेहताने एक ट्रक भरुन लाल गुलाब आणले होते, हे पाहून जूहीही हैराण होती. त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर जय मेहताने जूहीला लग्नासाठी प्रपोज केल्याचंही जूहीने सांगितलं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: