मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तुमच्यामुळे सिनेमाला केवळ धीर नाही तर धार आली ' अशोक सराफ यांच्यासाठी रितेशनं पोस्ट केला खास व्हिडिओ आणि तितकीच हृदयस्पर्शी पोस्ट

'तुमच्यामुळे सिनेमाला केवळ धीर नाही तर धार आली ' अशोक सराफ यांच्यासाठी रितेशनं पोस्ट केला खास व्हिडिओ आणि तितकीच हृदयस्पर्शी पोस्ट

 सुपरस्टार अशोक सराफ आज 4 जून रोजी 75 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. यासिनेमाबद्दल आणि अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नुकताच रितेश देशमुखनं सांगितला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 4 जून- सुपरस्टार अशोक सराफ (  happy birthday ashok saraf ) आज 4 जून रोजी 75 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. यासिनेमाबद्दल आणि अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नुकताच रितेश देशमुखनं सांगितला आहे. यासंबंधी एक सुंदर पोस्ट देखील रितेशनं केली आहे. रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. रितेशनं खास पद्धतीनं मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशष देशमुखनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काही लोकांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला आश्वासक वाटतं…धीर येतो.‘अशोक सराफ’ हे तसंच नाव. अशोक मामा, तुम्ही आज पंचाहत्तरीची तरुणाई गाठली. #वेड चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न केला. आणि पहिला प्रयत्न असूनही तुम्ही आशिर्वादासारखे माझ्या पाठिशी उभे राहिलात. तुमच्या सहभागाने आम्हाला केवळ धीर नाही आला तर चित्रपटालाच धार आली आहे.मामा तुम्हाला आरोग्य, दीर्घाआयु आणि समाधान लाभो हीच निसर्गाकडे प्रार्थना. #ashoksaraf #happybirthday...असी पोस्ट रितेशनं करत एक व्हिड़िओ देखील पोस्ट केला आहे.

वाचा-परम सुंदरीचा Kohl killer black look पाहून थेट तापमानात होईल वाढ

रितेश या व्हिडिओमध्ये दिसतो आहे की, “गेल्या 20 वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. जेव्हा ‘वेड’ चित्रपटाच्या लेखनाचे काम सुरु होते तेव्हा कुठे तरी वाटत होतं, या चित्रपटात अशोक मामांची भूमिका असावी म्हणजे जेणेकरून अशोक मामांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होईल. मी पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करतोय आणि त्यात अशोक मामा आहेत, हे सर्व स्वप्नवत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता, मुळात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे एखादा विनोदी सीन करतांना त्यांनी आपल्या अनुभवातून त्यात आवश्यक ते बदल करून त्यात जिव ओततात. एका दिग्दर्शकाला आपला लाडका अभिनेता, आपण लिहून दिलेल्या सिन पेक्षा जास्त आपल्या अभिनय कौशल्यातून देतो तेव्हा आणखी काय हवंय.. असं म्हणत त्याने अशोक मामांना एकदम खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Riteish Deshmukh