मुंबई 4 ऑगस्ट : बॉलिवूडच्या भाईजानचा भाऊ तसेच अभिनेता अरबाज खानचा (Arbaaz Khan) आज वाढदिवस. अरबाज आज त्याचा 54वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कुटुंबातील अरबाज फारच कमी चित्रपटांत दिसला. भाऊ सलमान खान (Salman Khan) प्रमाणे अभिनयात तितकसं यश मिळालं नसलं तरीही त्याने दिग्दर्शनात यश मिळवलं आहे. अरबाजच्या वाढदिवसानिमित्त जाणूनघ्या त्याच्याविषयी खास गोष्टी.
अरबाजने ‘दरार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मुख्य अभिनेत्यापेक्षा त्याला सहाय्यक अभिनेता म्हणून मोठी ओळख मिळाली. आजही प्रेक्षक त्याच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील त्याचं पात्र आठवतात. या चित्रपटात सलमान खान मुख्य अभिनेता होता ते अरबाज सहाय्यक अभिनेता. यासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
'गोड आणि तिखट सर्वकाही...'; अनन्या पांडेने दाखवला आपला सुपरहॉट अवतार
View this post on Instagram
अरबाजने अनेक चित्रपटांत सलमानच्या भावाचं पात्र साकारलं आहे. भावांची ही जुगलबंदी अनेकदा पडद्यावरही पाहायला मिळाली. ‘दबंग’ (Dabang) चित्रपटात अरबाजने केवळ चित्रपटात अभिनय नाही तर त्याची निर्मितीही केली होती. हा चित्रपट अरबाजच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट सिद्ध झाला. त्यानंतर अरबाजने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ओपन केलं व ‘दबंग 2’ हा चित्रपट केला, जो सुपरहीट ठरला होता.
मालदिवमध्ये अवतरली महाराष्ट्राची 'अप्सरा'; सोनाली कुलकर्णीने दाखवला आपला हॉट Bikini अवतार
View this post on Instagram
अरबाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फार चर्चेत असतो. अरबाज त्याची पूर्व पत्नी मलायकाला (Malaika Arora) एका जाहीरातीच्या सेटवर भेटला होता. दोघांनी तब्बल पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 12 डिसेंबर 1998ला विवाह केला. लग्नाच्या 19 वर्षांनतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना 19 वर्षिय मुलगा देखील आहे. सध्या अरबाज एका इटालियन मॉडेलला डेट करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Malaika arora, Salman khan