मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Birthday Girl Ankita Lokhande डिसेंबरमध्येच सुशांतसोबत करणार होती लग्न, पण...

Birthday Girl Ankita Lokhande डिसेंबरमध्येच सुशांतसोबत करणार होती लग्न, पण...

Birthday Girl Ankita Lokhande

Birthday Girl Ankita Lokhande

'पवित्र रिश्ता' (pavitra rishta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 19 डिसेंबर: 'पवित्र रिश्ता' (pavitra rishta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकतीच अंकिताने प्रियकर विकी जैनसोबत (vicky jain) लग्नगाठ बांधली असून सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे. 14 डिसेंबरला अंकिता मिसेस जैन बनली आहे. मात्र, एक वेळ अशी होती सुंशातसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता स्वतःलादेखील विसरुन गेली होती. त्यावेळी, विक्की जैनने तिला साथ दिली.

सुशांतसोबत  पाहिली होती लग्नाची स्वप्ने

विकी जैनला डेट करण्यापूर्वी अंकिता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे साऱ्यांनाच ठावूक आहे. पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर या दोघांचे सूत जुळले. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये सुशांतने 2016 डिसेंबरमध्ये अंकितासोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु, डिसेंबर 2016 मध्ये लग्न करण्याऐवजी या दोघांच्या ब्रेकअपचं वृत्त समोर आले.

ब्रेकअपनंतर जवळपास 2 वर्ष अंकिता स्वतःला सावरु शकली नाही

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता फार ढासळून गेली होती. ब्रेकअपनंतर जवळपास २ वर्ष तिने कलाविश्वापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने अनेक मोठे प्रोजेक्ट्सही नाकारले होते. परंतु, काही वर्षांनंतर 2018 मध्ये तिच्या आयुष्यात विकी जैन आला आणि डिसेंबर 2021 मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली.

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता पूर्णपणे तुटली होती. अशा परिस्थितीत विकीने तिला प्रत्येक वेळी मित्राप्रमाणे सांभाळले. लोकांनी तिच्यावर अनेक आरोप केले आणि सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले गेले. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतरही तिच्याकडे बोटे दाखवण्यात आली होती. पण विकी नेहमी तिच्यासमोर भिंतीसारखा उभा राहिला. सुशांत प्रकरणातही लोक अंकिताला ट्रोल करत असताना विकीने अंकिताला सपोर्ट करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.

अंकिता आणि विकीची पहिली भेट

रिपोर्ट्सनुसार, अंकिता लोखंडे आणि विकी जैन एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले होते. ब्रेकअपनंतर अंकिताने प्रवास करणे, लोकांना भेटणे, बोलणे बंद केले होते. पण या गोष्टींपासून स्वत:ला दूर करण्यासाठी ती एका मित्राच्या पार्टीत सहभागी झाली. याच पार्टीत विकी जैनही उपस्थित असल्याने दोघांची नजरानजर झाली.ते एकमेकांना आवडले आणि हळू हळू संवाद सुरू झाला.

2018 साली एकमेकांना डेट करण्यास सुरुवात!

यानंतर त्यांच्या भेटीचा सिलसिला वाढू लागला आणि त्यांच्या अफेअरची चर्चाही आगीसारखी पसरली. अंकिता तिचे विकीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असे, पण तिने त्यांच्या नात्याबद्दल कधीच काही सांगितले नाही. 2018 मध्ये अंकिताने विकीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, पण दोघांनीही आपल्या नात्याला वेळ दिला, एकमेकांना समजून घेतले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला.

वर्षभर एकमेकांसोबत राहिल्यानंतर विकी जैनने 2019 मध्ये अंकिताला प्रपोज केले. विकी जैनने गुडघ्यावर बसून अंकिताला प्रपोज केले. अंकितानेही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशाच काही फोटोंपैकी एक शेअर करत तिने कॅप्शन लिहिले होते की, ‘मी याचा विचार करेन विकी जैन’.

4 वर्षांच्या डेटिंगनंतर केले लग्न!

2019 मध्ये अंकिता आणि विकीचे लग्न होऊ शकते असे बोलले जात होते, पण तसे झाले नाही. 2020 मध्येही दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. पण 2021 मध्ये एका आघाडीच्या मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने ती लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर डिसेंबरमध्ये त्यांच्या लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या. 4 वर्षे एकमेकांसोबत डेटिंग केल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये दोघांनी लग्न केले. अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या दोघेही त्यांचा हनिमून पीरियड एन्जॉय करत आहेत.

First published:

Tags: Ankita lokhande, Entertainment, Sushant sing rajput