Happy Birthday Anil Kapoor: 64 वर्षाचा तरुण! काय आहे अनिल कपूरचा फिटनेस मंत्रा?

अनिल कपूरच्या (Anil Kapoor) शिस्तबद्ध जीवनपद्धतीमुळेच आजही तो तेवढाच यंग आणि डॅशिंग दिसतो. जुग जुग जिओच्या (Jug Jug Jio) सेटवर अनिलचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.

अनिल कपूरच्या (Anil Kapoor) शिस्तबद्ध जीवनपद्धतीमुळेच आजही तो तेवढाच यंग आणि डॅशिंग दिसतो. जुग जुग जिओच्या (Jug Jug Jio) सेटवर अनिलचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला.

 • Share this:
  मुंबई, 24 डिसेंबर:  बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनिल कपूरकडे बघून कोणालाही विश्वास बसणार नाही की तो 3 मुलांचा बाबा आणि 64 वर्षांचा आहे. या वयातही अनिल कपूर एवढा तरुण दिसण्यामागचं कारण त्याने स्वत:वर घेतलेली प्रचंड मेहनत हे आहे. फिटनेसच्या बाबतीत अनिल कपूर अतिशय जागरुक आहे. आजही त्याचं पिळदार शरीर आणि भन्नाट लूक्स प्रेक्षकांना फिदा करतात. काय आहे अनिल कपूरचा फिटनेस मंत्रा ? अनिल कपूरच्या दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता होते. दररोज 3 तास तो जिममध्ये व्यायाम करतो. व्यायामामध्ये नाविन्य आणण्यासाठी सायकलिंग, स्विमिंग, जॉगिंग, कार्डिओ अशा वेगवेगळ्या एक्सासाइज तो करत असतो. याशिवाय क्रंचेस, सिट-अप्स, फ्री वेट्स, पुश-अप्स आणि योगावरही त्याचा भर असतो. मद्यपान, धूम्रपान, चहा, कॉफी या सगळ्यापासून त्याने स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवलं आहे.एवढंच काय जास्त साखर असलेले पदार्थ, जंक फूड तो कधीच खात नाही. याऊलट जास्तीत जास्त दुधाचे पदार्थ त्याच्या आहारात असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अनिल कपूर अशाच प्रकारची लाइफस्टाइल फॉलो करत आला आहे. त्यामुळेच तो अतिशय फिट आहे.
  View this post on Instagram

  A post shared by anilskapoor (@anilskapoor)

  सध्या अनिल कपूर जूग जूग जिओच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनिल कपूरचा वाढदिवस त्याच्या सेटवरच दणक्यात साजरा करण्यात आला.तसंच सोनम कपूरने अनिल कपूर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

  अनिल कपूरने आत्तापर्यंत बेटा, दिवाना मस्ताना, लम्हे, परींदा, तेजाब, लज्जा, वेलकम, तेज, रेस असे अनेक बहारदार चित्रपट करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: