मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: तब्बल चार वेळा लग्नं केलंय अदनान सामीने; नागरिकत्वामुळे गायक असतो चर्चेत

HBD: तब्बल चार वेळा लग्नं केलंय अदनान सामीने; नागरिकत्वामुळे गायक असतो चर्चेत

मूळ पाकिस्तानी असलेल्या अदनानने (Adnan Sami) भारतात स्वतःचं मोठं नाव कमावलं तर नंतर तो भारतीय नागरीकही झाला. वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अदनानविषयी खास गोष्टी.

  मुंबई 15 ऑगस्ट : प्रसिद्ध गायक अदनान सामीचा (Adnan Sami) आज वाढदिवस. 15 ऑगस्ट 1971 ला अदनानचा लंडनमध्ये जन्म झाला. लंडनमध्येच अदनानचं बालपण गेलं तर गायणाचं शिक्षणही त्याने तिकडेच घेतलं. मूळ पाकिस्तानी असलेल्या अदनानने भारतात स्वतःचं मोठं नाव कमावलं तर नंतर तो भारतीय नागरीकही झाला. पण त्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकच त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अदनानविषयी खास गोष्टी. भारत सरकारचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार सन्मानित अदनानला पदोपदी पाकिस्तानमुळे ट्रोलही व्हावं लागलं आहे. अदनानचे वडील हे पाकिस्तानी सैन्यात एका मोठ्या पदावर काम करत होते. तर अदनान लंडनमध्ये होता. अदनानने म्युझिक इंडस्ट्रित करिअर करण्यासाठी भारताची निवड केली होती. अनेक सुपहीट गाणी गाऊन त्याने अनेक रसिकमनं जिकंली. अदनानला त्याच्या वजनामुळेही फार संकट झेलावी लागली होती. एकेकाळी 225 किलो त्याचं वजन होतं. पण केवळ 16 महिन्यांच्या मेहनतीत त्याने स्वतःचा कायापालट केला. व 75 किलो वजन केलं.
  View this post on Instagram

  A post shared by Adnan Sami (@adnansamiworld)

  अदनानचं वैयक्तिक आयुष्य फरच विवादीत राहिलं आहे. त्याने एक दोन नव्हे तर 4 वेळा लग्न केलं होतं. काही लग्न तर त्याची 5 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकली नव्हती. 1993 साली अदनानने अभिनेत्री जेबा बख्तियारशी (Zeba Bakhtiar) विवाह केला होता. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
  View this post on Instagram

  A post shared by Adnan Sami (@adnansamiworld)

  यानतंर त्याने दुबईतील एका उद्योजक महिलेशी विवाह केला. अरब सबा गलदारी असं तिचं नाव होतं. पण काही दिवसांतच हे लग्नंही तुटलं. सबा आधीच विवाहीत होती तर तिला एक मुलगाही होता. पण 2008 साली सबा पुन्हा मुंबई आली आणि अदनानशी विवाह करून राहू लागली. पण त्यांच्यात पुन्हा दुरावे आले. व ते वेगळे झाले. नेक विवादांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2010 साली त्याने रोया सामी खानशी विवाह केला. रोया आणि अदनान आजही सोबत आहेत. त्यांना एक मुलगी देखील आहे. अनेकदा ते एकत्र दिसतात. अदनानला अनेक प्रयत्नांनंतर अखेर 2016 साली अधिकृत रित्या भारतीय नागरिकत्व मिळालं. यानंतर पाकिस्तानातून त्याच्यावर फार टीकाही झाली होती. तसेच भारतातूनही काहींनी त्याला ट्रोल केलं होतं. पण अदनान नेहमीच त्यांना सडेतोड उत्तरं देत असतो.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Singer

  पुढील बातम्या