मुंबई, 05 फेब्रुवारी: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan Birthday) एक उत्तम अभिनेता आहे. त्याचा जन्म महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या घरी 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईमध्ये झाला. आज अभिषेकचा 46वा (Happy Birthday Abhishek Bachchan) वाढदिवस आहे. अभिषेक बच्चन जरी महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असला, तरी त्याला डेब्यू फिल्म (Abhishek Bachchan debut flim) मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. याबद्दल खुद्द अभिषेकने सांगितलं होतं.
अभिषेकला बनायचं होतं एलआयसी एजंट
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठं नाव आहे. मात्र, त्याचा फायदा अभिषेकला झाला आणि त्याला अगदी सहज खूप चित्रपट मिळाले, असं झालं नाही. अभिषेकला चित्रपट आणि इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेकला चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी एलआयसी एजंट बनायचं होतं. मात्र, तसं घडलं नाही. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फिल्मी प्रवासापूर्वी पाहूयात त्याच्या माहित नसलेल्या काही खास गोष्टी.
हे वाचा- मौनीने लग्नात घातलं होतं 22 कॅरेट सोनं, तिच्या ज्वेलरीबद्दल जाणून घ्या डिटेल्स
अभिषेकबद्दलच्या काही खास गोष्टी
अभिषेक बच्चनचा आवाजदेखील वडील अमिताभ बच्चन यांच्या आवाजाप्रमाणे भारदस्त आहे. अभिषेकने ‘ब्लफमास्टर’ चित्रपटात एक गाणं गायलंय. याशिवाय त्याला लहानपणापासूनच डान्स करायला खूप आवडतं. असं म्हणतात की अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ (Don) चित्रपटातील ज्या डान्सची (dance) आजही चर्चा होते, त्यामागे अभिषेक कारणीभूत आहे. अमिताभच्या आयकॉनिक ‘खाईके पान बनारस वाला’ या गाण्याच्या स्टेप्स अभिषेकच्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लहानपणी अभिषेक मस्ती करताना, घरात नाचत असताना अशा डान्स स्टेप्स करायचा. त्याच स्टेप्स अमिताभ लक्षात ठेवायचे आणि त्याचा वापर त्यांनी त्यांच्या चित्रपटात केला.
अभिषेकचा डेब्यू चित्रपट ‘रेफ्यूजी’
अभिषेकने 2000 साली ‘रेफ्यूजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर होती. बॉलिवूडमधील दोन मोठ्या फिल्मी कुटुंबातील दोन मुलांनी या चित्रपटातून डेब्यू केलं होतं. इंडस्ट्रीमध्ये 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर अभिषेकने रॉलिंग स्टोन इंडियासोबत बोलताना कबुली दिली होती की, 21 वर्षांच्या या प्रवासात त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला.
हे वाचा- Nora Fatehi ने डिलीट केलं तिचं Instaअकाउंट? काय आहे यामागचं कारण
पहिला चित्रपट मिळवण्यासाठी लागली दोन वर्षं
अभिषेकने स्वतः सांगितलं कि, ‘रेफ्यूजी’ चित्रपट मिळवण्यासाठी त्याला 2 वर्षं लागली होते. तो सांगतो कि, ‘बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी अमिताभ बच्चनचा मुलगा आहे तर लोक 24 तास माझ्यासाठी रांगेत उभे असतील. पण तसं काहीच नाही. डेब्यू करण्यापूर्वी मी प्रत्येक डायरेक्टरजवळ गेलो त्यांना भेटलो, बोललो पण सर्वांनीच माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.’
अभिषेक बच्चनने आतापर्यंत अनेक चित्रपट केले. कमी प्रमाणात बॉलिवूडमध्ये काम केलं असलं तरी अभिषेकचे चित्रपट उत्तम होते. अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Amitabh Bachchan, Birthday celebration, Bollywood actor, Bollywood News