मुंबई, 29 जून : बिग बाॅस मराठीत आजचा कळीचा प्रश्न हा आहे की कोण होणार कॅप्टन ? काल होऊ दे चर्चामध्ये पुष्करच्या चार वेळा बातम्या सर्वोत्कृष्ट ठरल्या. त्यामुळे आज पुष्कर कॅप्टनसीचा पहिला उमेदवार ठरणारेय. पण बिग बाॅस मेघा, आस्ताद आणि सईमधून घरातल्या सदस्यांना एका उमेदवाराची निवड करायला सांगणार आणि सुरू होणारा वादांचा सिलसिला. सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठावर नाराज होणारेय. कारण मेघा आणि शर्मिष्ठा आपली मतं आस्तादला देणार आहेत. सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा यांच्यावर चिडणार असून आता त्यांची तिला या स्पर्धेमध्ये गरज नाही आणि तिच्याकडून कुठल्याही प्रकारचा पाठिंबा यापुढे त्यांनी मागू नये असे सई त्यांना सांगणार आहे.
हेही वाचा
'या' घटनेमुळे आत्महत्या करायची होती 'संजू' बाबाला !
'संजू' पाहायला पोचला संजय दत्त!
आज बिग बॉस 'एक डाव नावाचा' हे कॅप्टनसीचे कार्य सोपवणार आहेत. कॅप्टन या शब्दाचे महत्त्व अधोरेखित करणे हे या कार्याचे उद्देश आहे. कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन ? मेघा आणि सईचे भांडण कोणत्या टोकाला जाणार ? या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.
काल बिग बाॅस मराठीत होऊ दे चर्चा चांगलीच रंगली होती. पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी खूप ब्रेकिंग न्यूज दिल्या. पुष्करचं नृत्य खास ट्र्ीट ठरलं.
टास्क करताना आस्तादची मेघा आणि सईबरोबर शाब्दिक चकमक उडाली होती. आऊंनीही अनिल थत्तेंबद्दल ब्रेकिंग न्यूज दिल्या.
त्यामुळे आज काय होतंय याची उत्सुकता आहे.