मुंबई, 5 डिसेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या पहायला मिळत आहे. तिच्या लग्नाच्या फंक्शनचेही अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले. अखेर हंसिका मोटवानीने 4 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर बिझनेसमॅन सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली. हंसिकाच्या लग्नाचे अनेक गोड क्षण सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोघांवरही नव्या जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचा विवाह राजस्थानमधील जयपूरजवळील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये झाला. अभिनेत्रीच्या फॅन पेज अकाउंटवरून रॉयल वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. हंसिका मोटवानीने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हंसिकाने हा सुंदर लेहेंगा पारंपारिक दागिने आणि बांगड्यासह घातला होता. लग्नाच्या खास दिवशी सुहेल कथुरियाने शेरवानी घातली होती. तोही खूप हॅंडसम दिसत होता.
View this post on Instagram
जयपूरमध्ये 2 डिसेंबरपासून हंसिका आणि सुहेलच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले. सर्व समारंभांमध्ये अभिनेत्रीने तिचा लग्नाचा लूक क्लासी ठेवला. माता की चौकीसाठी साधी लाल साडी असो, किंवा सूफी रात्रीसाठी क्रीम शरारा असो, किंवा लग्नाआधीच्या पार्टीसाठी पांढरा ड्रेस असो किंवा संगीतासाठी लाल गुलाबी रंगाचा लेहेंगा असो, हंसिका मोटवानी प्रत्येक वेळी सदगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर हंसिका आणि सोहेल लग्नबंधनात अडकले असून त्यांचे चाहतेही त्यांच्यासाठी खूप आनंदी आहेत.
View this post on Instagram
सुहेलने आयफेल टॉवरसमोर आपल्या प्रेमिका हंसिकाला प्रपोज केले होते. हे जोडपे आधीच एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. आता ते लाइफ पार्टनरही झाले आहेत. सध्या दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी आणि व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं असून सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसत आहेत.
दरम्यान, अभिनेत्री हंसिका मोटवनीने टीव्ही विश्वातून पदार्पण केलं होतंं. तिने 'क्युंकी सास भी कभी बहु थी', 'शाका लाका बुम बुम', 'सोनपरी', अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळाली. तीने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं असून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Marriage, South actress, South film