Home /News /entertainment /

Hansal Mehta Marraige: भारताची सगळ्यात unique story: 17 वर्ष Live-in मध्ये राहून हन्सल मेहता यांनी घातला लग्नाचा घाट, मुलगी सुद्धा आहे 16 वर्षांची

Hansal Mehta Marraige: भारताची सगळ्यात unique story: 17 वर्ष Live-in मध्ये राहून हन्सल मेहता यांनी घातला लग्नाचा घाट, मुलगी सुद्धा आहे 16 वर्षांची

हन्सल मेहता या दिग्दर्शकाने काल तेलगीच्या स्कॅम 2003 ची घोषणा तर केली मात्र त्यांच्या आज आलेल्या लग्नाच्या न्यूजने आणखीन खळबळ माजवली आहे. कधीकाळी हन्सल लग्नाला का नकार देत होते? असं असताना आत्ता केलेलं लग्नही स्कॅम आहे का? याबद्दल जाणून घ्या.

पुढे वाचा ...
    मुंबई 25 मे: Age is just a number या म्हणीचा हल्लीच्या काळात पदोपदी प्रत्यय येत आहे. प्रेम केलं की त्यात कोणाचंही वय, जात कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते. त्याला नगण्य महत्त्व देत खुल्लम खुल्ला प्यार करत अनेक कपल्स जगत असतात. असाच काहीसा प्रकार हन्सल मेहताच्या (Hansal Mehta Director) बाबतीत पाहायला मिळत आहे. हन्सल मेहता या नामांकित दिग्दर्शकाने मॉडर्न लव्हचं (Modern Love) उदाहरण ताजं ठेवत वयाच्या जवळपास पंचावन्नव्या वर्षात येत येत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा (Hansal Mehta Marriage) निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटोज् सध्या इंस्टाग्रामवर जबरदस्त वायरल होत आहेत. वयाची एवढी वर्ष उलटून गेल्यावर हन्सल यांना लग्न करावंसं का वाटलं हे कोडं सगळ्यांना आहे. हन्सल यांनी सोशल एक्टिव्हिस्ट सफिना हुसैन यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. "....लग्न म्हणजे वेडेपणाचं लक्षण" म्हटले होते हन्सल कधीकाळी लग्न करणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण असं म्हणणारे हन्सल तब्ब्ल 17 वर्षाच्या लिव्ह इन रिलेशनशिप (Hansal Mehta live in relationship) मध्ये राहून पुन्हा एकदा विवाहबद्ध झाले आहेत. हन्सल मेहता यांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की दोन मुलं झाल्यांनतर पुन्हा लग्न करणं हा शुद्ध वेडेपणा आहे. ते पुढे असंही म्हणाले होते की त्यांची पार्टनर आणि ते फक्त प्रेमासाठी सोबत आहेत कोणत्याही सर्टिफिकेटसाठी ते बांधील नाहीत. हन्सल यांना दोन मुलं असून त्यांचं नाव जय आणि पल्लव असं आहे. याबद्दल रीतसर पोस्ट करत हन्सल लिहितात, "तब्ब्ल 17 वर्ष आणि दोन अपत्यानंतर, मुलांना मोठं होताना आणि त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावताना बघत आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्याप्रमाणे हा निर्णय देखील अनपेक्षित होता. आमचं वचन मात्र अगदी खरं आहे. शेवटी प्रेम हे सगळ्यापेक्षा सरस आहे आणि तेच पुन्हा सिद्ध झालं." हे ही वाचा- स्कॅम 1992 च्या यशानंतर 'Scam 2003 The Telgi Story' प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता दिसणार तेलगीच्या भूमिकेत हन्सल यांची पहिली पत्नी सुनीता यांच्याशी अगदी तरुणपणी लग्न झालं आणि दुर्दैवाने ते लग्न टिकलं नाही. हन्सल यांचा 2000 साली घटस्फोट झाला. सुनीता यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. हन्सल यांची पत्नी सफिना ही अभिनेते युसूफ हुसैन यांची मुलगी आहे. सफिना स्वतः सोशल एक्टिविस्ट असून त्या 'Educate Girls' नावाच्या संस्थेच्या संस्थपिका आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी त्या कार्यरत आहेत. सफिना आणि हन्सल यांना किमया आणि रेहाना नावाच्या दोन मुली आहेत. हन्सल यांच्या पहिल्या पत्नीपासून जय आणि पल्लव अशी दोन मुलं आहेत. कायमचं मॉडर्न विचारसरणीच्या हन्सल यांचं लग्न मात्र आता चर्चेत येत आहे. वयाचा एवढा टप्पा गाठून झाल्यावर एवढ्या उशिरा लग्न केल्याने फॅन्सही चक्रावले आहेत. हन्सल मेहता यांनी कालचं स्कॅम 2003 या अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर आणि त्याने केलेल्या घोटाळ्यावर आधारित वेबसिरीजचा टीजर शेअर केला होता. स्कॅम 1992 च्या यशानंतर स्कॅम 2003 मध्ये काय वेगळं असेल याची उत्सुकता असताना लग्नाच्या आलेल्या बातमीने त्यांचं खाजगी आयुष्य सुद्धा चर्चेत आलं आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    पुढील बातम्या