'हाफ गर्लफ्रेंड'च्या रोमँटिक 'बारिश'मध्ये भिजले एक कोटीपेक्षा जास्त रसिक

'हाफ गर्लफ्रेंड'च्या रोमँटिक 'बारिश'मध्ये भिजले एक कोटीपेक्षा जास्त रसिक

श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांचा 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमा रिलीज आधीच हिट झालाय. सिनेमाचं ट्रेलर जवळपास दोन करोड लोकांनी पाहिलं आहे.

  • Share this:

15 एप्रिल : श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांचा 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमा रिलीज आधीच हिट झालाय. सिनेमाचं ट्रेलर जवळपास दोन करोड लोकांनी पाहिलं आहे. या सिनेमातील 'बारिश' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांनी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद दिलाय.

यूट्यूबवर या रोमॅन्टिक गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. दोन दिवसात या गाण्याला यूट्यूबवर एक करोडपेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत.

अॅश किंग आणि साशा तिरुपती यांनी हे गाणं गायल तर तनिष्क बागची यांनी संगीत  दिलयं. या गाण्याला 13,244,745 व्ह्यूज मिळाले असून 173,320 लोकांनी लाईक केल आहे.

'हाफ गर्लफ्रेंड' चं हे रोमॅन्टिक गाणं श्रद्धाने तिच्या ट्विटरवर शेअर केलय. काही गाणी ऐकताच तुम्हाला प्रेम जडतं, असंही तिने ट्विट करताना लिहिलंय.

First published: April 15, 2017, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading