हाजी मस्तानला डॉन दाखवण्याची चूक करू नये, रजनीकांतला मस्तानच्या मुलाची धमकी

हाजी मस्तानच्या जीवनावर चांगला चित्रपट बनवा असा सल्लाही त्याने रजनीकांतला दिला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 13, 2017 04:50 PM IST

हाजी मस्तानला डॉन दाखवण्याची चूक करू नये, रजनीकांतला मस्तानच्या मुलाची धमकी

13 मे : एके काळी मुंबईचा डॉन राहिलेल्या हाजी मस्तानच्या मुलाने सुपरस्टार रजनीकांतला धमकी दिलीये. हाजी मस्तानची नकारात्मक भूमिका दाखवली तर सोडणार असा सज्जड दमच त्याने रजनीकांतला भरलाय.

त्याचं झालं असं की, हाजी मस्तानावर सुपरस्टार रजनीकांतचा 'गाॅडफादर' हा चित्रपट येतोय. त्यामुळे हाजी मस्तानचा मुलगा सुंदर शेखरने या चित्रपटावरुन थेट द बाॅस रजनीकांतला धमकीच दिलीये.

"हाजी मस्तानच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात येत आहे. हे ठीक आहे. जर हाजी मस्तानला नकारात्मक भूमिकेत दाखवलं तर रजनीकांतला सोडणार नाही असा इशारा त्याने दिलाय.

तसंच तुम्ही हाजी मस्तानवर 'गॉडफादर' हा चित्रपट बनवताय. पण चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका दाखवू नका. हाजी मस्तानला लोक अंडरवर्ल्ड डॉन आणि तस्कर म्हणून ओळखत होते. पण हाजी मस्तानला न्यायलयाने दोषी ठरवलं नाही. आणि त्याचा एक राजकीय पक्ष आजही अस्तित्वात आहे त्यामुळे हाजी मस्तानच्या जीवनावर चांगला चित्रपट बनवा असा सल्लाही त्याने रजनीकांतला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...