मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजेश खन्नांच्या चित्रपटामुळं काजोल गेली होती नैराश्येत; केला होता अन्नत्याग

राजेश खन्नांच्या चित्रपटामुळं काजोल गेली होती नैराश्येत; केला होता अन्नत्याग

लोकप्रिय भिनेत्याचा एक चित्रपट पाहून अभिनेत्री काजोल (kajol) नैराश्येत गेली होती. तिचं अन्न-पाण्याचा त्याग केला होता. पाहा काय होता तो किस्सा...

लोकप्रिय भिनेत्याचा एक चित्रपट पाहून अभिनेत्री काजोल (kajol) नैराश्येत गेली होती. तिचं अन्न-पाण्याचा त्याग केला होता. पाहा काय होता तो किस्सा...

लोकप्रिय भिनेत्याचा एक चित्रपट पाहून अभिनेत्री काजोल (kajol) नैराश्येत गेली होती. तिचं अन्न-पाण्याचा त्याग केला होता. पाहा काय होता तो किस्सा...

मुंबई 4 एप्रिल: राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी तब्बल एक दशक बॉलिवूड सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्याकाळातील तरुणीतर त्यांना चक्क आपल्या रक्तानं लिहिलेली प्रेम पत्र पाठवायच्या असं म्हटलं जातं. त्यांची एक झलक पाहण्यासाठी दररोज शेकडो लोक त्यांच्या घराभोवजी जमा होत असंत. इतक्या लोकप्रिय भिनेत्याचा एक चित्रपट पाहून अभिनेत्री काजोल (kajol) नैराश्येत गेली होती. तिचं अन्न-पाण्याचा त्याग केला होता. पाहा काय होता तो किस्सा...

काजोलची आई तनुजा (Tanuja) या बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत हाथी मेरे साथी (Haathi Mere Saathi)  या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटामुळंच काजोल नैराश्येत गेली होती. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तनुजा यांनी हा किस्सा सांगितला होता.

अवश्य पाहा - नातं जोडलं अनेकांशी पण अखेर राहिली एकटी; पाहा परवीन बाबीची Love Tragedy

त्यांना हत्तीची प्रचंड भीती वाटत असे. परंतु हाथी मेरे साथी या चित्रपटामुळं त्यांची ती भीती नाहिशी झाली. त्यांना हत्ती आवडू लागले आहेत हे कुटुंबीयांना देखील कळून चूकलं. त्या दर रवीवारी काजोलला घेऊन हत्तीला भेटायला जायच्या. त्यावेळी काजोल केवळ चार वर्षांची होती. त्याच दरम्यान तिनं हाथी मेरे साथी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या शेवटी हत्ती मरतो. हे दृश्य पाहून काजोलला खूप दु:ख झालं. तो हत्ती जणू आईमुळंच मेला असा तिचा समज झाला होता. यामुळं ती दोन आठवडे नैराश्येत होती. कुटुंबीयांशी बोलत नव्हती. जणू अन्न पाण्याचा त्यागच केला होता. अखेर या चित्रपटा पार्ट 2 देखील येणार अन् त्यात तो हत्ती पुन्हा येणार असं सांगितल्यानंतर काजोल पुर्ववत झाली. हा किस्सा सांगताना जुन्या आठवणींमुळं तनुजा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

First published:

Tags: Bollywood actress, Marathi entertainment