गुरूच्या आईबद्दल 'ही' गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

गुरूच्या आईबद्दल 'ही' गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

गुरूच्या चुका पोटात घालणारी आणि वेळ प्रसंगी त्याला रागावणारी गुरूची आई ही प्रेक्षकांमधलीच एक झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : गुरूच्या चुका पोटात घालणारी आणि वेळ प्रसंगी त्याला रागावणारी गुरूची आई ही प्रेक्षकांमधलीच एक झाली आहे. प्रेक्षकांना हे माहिती आहे का की गुरूची आई म्हणजेच अभिनेत्री भारती पाटील या मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

याबद्दल बोलताना भरती म्हणाल्या, "मेकॅनिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर माझे करिअर व्यवस्थित चालू होते. एकीकडे भरतनाट्यमही सुरू होते. न ठरवता अभिनय क्षेत्रात आले आणि रमले. कोणाला विश्वास बसणार नाही; पण इंजिनीअरिंग पूर्ण होईपर्यंत मी एकही नाटक पाहिलेलं नव्हतं."

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना भारती म्हणाल्या, "सध्या मी करत असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील नागपुरी बाजाची गुरूची आई वठवताना खूप मजा येते आहे. माझे सासर नागपूरचे आहे. माझे दीर, नणंदा यांच्या वागण्या-बोलण्याचं केलेलं निरीक्षण या वेळी माझ्या कामी आले. नुसताच विशिष्ट लहेजा पकडला म्हणजे नागपुरी भाषा आली, असं होत नाही. त्यासाठी देहबोली, खास नागपुरी शब्दही बोलण्यात आले पाहिजेत. हे ध्यानात ठेवून आम्ही तिकडचे बोलीभाषेतील शब्द, वाक्‌प्रचार आवर्जून वापरते."

सध्या या मालिकेत गुरूची आईच गुरूविरोधात गेलीय. शनाया बायको म्हणून घरी राहायला आलेली तिला आवडत नाही. पण शनायासाठी ती हे सहन करतेय.

रसिका सुनीलच्या जागी आता अभिनेत्री ईशा केसकर ही शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकंच पसंत करत आहेत.

ईशाला देखील शनायासारखीच शॉपिंगची खूप आवड आहे. नुकतंच तिने रसिकाची जागा घेतली असल्यामुळे मालिकेच्या कपडेपटातले रसिकाचे कपडे ईशाला होत नाहीत. त्यामुळे काही दिवस आधीचे कपडे वापरून तिनं वेळ निभावून नेली. पण ईशासाठी नवे कपडे आणावे लागले. त्यामुळे शूटिंगमधून वेळ काढून तिच्यासाठी कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे म्हणे. प्रेक्षकांना नव्या शनायाचा लुकही आवडतोय.

'या'दिवशी जनतेसाठी खुलं होणार मुघल गार्डन, पाहा अप्रतिम PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 02:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading