नवी दिल्ली, 20 जुलै: हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्त (Guru Dutt) यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. त्यांच्या कलाकृतींचा अजूनही लोक अभ्यास करतात. आपल्या छोट्याशा आयुष्यात गुरुदत्त यांनी असे सुपरहिट सिनेमे दिले की इतिहासाने त्यांची दखल घेतली. पण प्रोफेशनल लाइफमध्ये यशस्वी असलेल्या गुरुदत्त यांना खासगी आयुष्यातला तोल सांभाळता न आल्याने त्यांनी मृत्युला जवळ केलं. त्यांच्या 'प्यासा' (Pyasa) या चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं 'जानें वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला...' हे ऐकल्यावर आज असं वाटतं जणू ते त्यांच्या आयुष्यावरच लिहिलेलं गाणं होतं. 1953 मध्ये गुरु दत्त आणि गीता (Geeta Dutt) यांचं लग्न झालं. 1957 मध्ये त्यांच्यात वादावादी आणि दुरावा सुरू झाला. त्याला कारण म्हणजे गुरुदत्त यांना अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) आवडायला लागली.
गुरुदत्त वहिदामय झाले होते
आपण म्हणतो ना की माणूस प्रेमात (Love) किंवा आकर्षणात वेडापिसा होतो. तशीच अगदी तशीच अवस्था गुरुदत्त यांची झाली होती. वहिदा रेहमान त्यांना इतक्या आवडायच्या की गुरुदत्त त्यात जणू वेडेच झाले होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात (Married Life) विघ्न यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे गीता दत्त यांना लग्न टिकतंय का आणि गुरुदत्त आपल्याला सोडून वहिदाकडे जाणार नाहीत ना अशी चिंता वाटायला लागली होती.
देवाच्या परीक्षेसाठी लेकीचा जीव घातला धोक्यात; आईने 193 किमी स्पीडने पळवली कार
या सगळ्या प्रकाराला वैतागून गीता म्हणाल्या होत्या, 'जेंव्हापासून ती (वहिदा रेहमान) आमच्या आयुष्यात आली आहे तेंव्हापासून आमचं जगणं नरकासमान झालंय.'
गुरुदत्त यांच्या आयुष्यावर यासीर उस्मान यांनी ‘गुरुदत्त द अनसॅटिसफाइड स्टोरी’ (Guru Dutt The unsatisfied Story) हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गीता दत्त यांनी वहिदा यांच्याबदद्लचा आपला संताप व्यक्त करताना म्हटलं होतं, 'जेंव्हापासून ती आमच्या आयुष्यात आली आहे तेंव्हापासून आमचं जगणं नरकासमान झालंय.'
गीता दत्त वेगळ्या झाल्या होत्या
तुम्हाला माहितीए सिनेसृष्टी (Film Industry) आणि गॉसिपिंग यांचं किती जुनं नातं आहे. त्या काळातही नट-नट्यांच्या प्रेमप्रकरणांची (Love affairs) चर्चा सर्वत्र असायची. लोक आवडीने त्याबद्दल आपली मतं मांडायचे, अगदी आत्तासारखेच. पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. तर, तेव्हा अशीही चर्चा होती की गुरुदत्त यांच्याशी लग्न करता यावं म्हणून वहिदा रेहमान यांनी धर्म बदलला आणि त्या दोघांनी लग्नही केलं. नवऱ्याच्या प्रेमकहाण्या ऐकून गीता आपल्या मुलांना घेऊन वेगळ्या रहायला लागल्या. पत्नी घर सोडून गेल्यानंतर गुरुदत्त यांनी दारू, सिगरेट आणि झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली.
संसार तुटू नये म्हणून वहिदा यांनीही राखलं अंतर
आपल्यामुळे गुरुदत्त यांचा संसार मोडतोय हे कळाल्यानंतर वहिदा रेहमान यांनी गुरुदत्त यांच्यापासून दूर रहायला सुरुवात केली.
'मला लोकांची पर्वा नाही'; 87 वर्षांच्या आजीनं स्वीकारली आपली ट्रान्सजेंडर नात
आपल्या मुलांना आणि पत्नीला भेटायची गुरुदत्त यांना प्रचंड इच्छा होती पण तसं करता येत नव्हतं त्यामुळे ते मनातून खंगले.
मुलीला भेटायची इच्छा होती गुरुदत्तांना
बीबीसीच्या वृत्तानुसार 9 ऑक्टोबरला गुरुदत्त यांचे मित्र अबरार अलवी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा गुरुदत्त दारु पित होते. त्याच काळात त्यांचं फोनवर बायको गीता दत्त यांच्याशी कडाक्याचं भांडण झालं होतं. गुरू यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला भेटायची इच्छा होती आणि गीता दत्त त्यांना भेटू देत नव्हत्या. दारु पिऊन गुरुदत्त यांनी फोनवर गीता दत्त यांना इशारा दिला की मुलीला माझ्याकडे पाठव नाहीतर मी माझं काही बरंवाईट करून घेईन.
रात्री 1 वाजता अबरार आणि गुरदत्त जेवले आणि नंतर अबरार घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी अबरार यांना फोन आला की गुरुदत्त यांची तब्येत खराब झाली आहे. अबरार त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा गुरुदत्त कुडता पायजमा घालून पलंगावर झोपलेले त्यांना दिसले. शेजारच्या टीपॉयवर एका ग्लासमध्ये गुलाबी रंगाचं द्रव्य होतं. अबरार यांना लक्षात आलं की गुरुदत्त यांनी आत्महत्या केली आहे. लोकांनी विचारलं की तुम्हाला कसं कळालं तर त्यांनी सांगितलं की गुरुदत्त कायम मृत्यू येण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धतींबाबत अबरार यांना नेहमी विचारायचे.
एका जबरदस्त अभिनेता, दिग्दर्शकाचा अशाप्रकारे अंत झाला. आजही त्यांच्या कामाचं जगभर कौतुक होतं. पण खासगी आयुष्यात अपयशी झाल्यानंतर मात्र त्यांनी आत्महत्या करणं पसंत केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.