S M L

सलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी

संपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता.

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2018 09:39 PM IST

सलमान खानच्या हत्येचा कट उघड,आरोपीकडून मे महिन्यात घराची रेकी

हरियाणा, 09 जून : काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा धक्कादायक खुलासा गुरुग्राम एसटीएफच्या टीमने केलाय.

गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक केलीये. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी मागण्याचे 24 पेक्षा जास्त गुन्हे हरियाणासह अनेक राज्यात दाखल आहे. अटकेनंतर एसटीएफने केलेल्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता आणि यासाठी मुंबईतील त्याच्या घराची रेकी केली होती अशी कबुली त्याने दिली.

संपत नेहराने मुंबईतील वांद्रे येथील सलमानच्या घराची दोन दिवस रेकी केली होती. कट कोणत्या परिस्थितीत अयशस्वी होऊ नये यासाठी त्याने सलमान घरातून किती वाजता बाहेर येतो आणि सुरक्षारक्षकांची माहितीही गोळा केली होती.

मे महिन्यात सलमानच्या घराची रेकी

संपत नेहराने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलमानच्या घराची रेकी केली होती. संपत नेहरा सलमानचा चाहता असल्याचं भासवून हत्या करण्याच्या प्रयत्न करणार होता. जेव्हा सलमान घराच्या बाल्कनीत उभं राहुन चाहत्यांना अभिवादन करतो त्यावेळी त्याच्या हत्येचा मनसुबा संपतचा होता. एवढंच नाहीतर फॅन्स आणि सलमानमध्ये किती अंतर असतं याचाही आढावा घेऊन गोळी झाडण्याचा संपतचा डाव होता. पण संपत आपल्या कटात यशस्वी होण्याआधीच एसटीएफच्या टीमने हैदराबादमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Loading...
Loading...

लाॅरेंस बिश्नोईने दिली होती सलमानला धमकी

काळविट शिकार प्रकरणी गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सध्या संपत नेहरा अटकेत असून सलमानच्या हत्येचा कट उधळला गेलाय. संपतच्या या कटात कोण-कोण सहभागी आहे याची माहिती एसटीएफची टीम गोळा करत आहे. संपत नेहराच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आङे.

तुरुंगात शिजला सलमानच्या हत्येचा कट

एसटीएफला संपत नेहराच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, लाॅरेंस बिश्नोईने तुरुंगात बसून सलमानच्या हत्येचा कट रचला होता. सलमानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवण्यात आली होती. बिश्नोईची संपत नेहराची ओळख तुरुंगातच झाली होती. त्यानंतर संपत नेहरा बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला. संपत हा चंडीगढ विद्यापीठात असताना बिश्नोईच्या संपर्काता आला होता.

संपत नेहरा कार चोरीत झाली होती अटक

संपत नेहराला 2016 मध्ये कार चोरी प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला होता. संपत नेहराने इनेलोचे माजी आमदाराच्या भावाच्या हत्येचा प्रयत्न केला होता.  एवढंच नाहीतर हरियाणा, राजस्थान आणि पंजाब पोलिसांनी त्याच्यावर दोन लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2018 09:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close