मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Happy Birthday Gulzar: गीतकार होण्याआधी गॅरेजमध्ये काम करायचे गुलजार; अशी मिळाली होती पहिली संधी

Happy Birthday Gulzar: गीतकार होण्याआधी गॅरेजमध्ये काम करायचे गुलजार; अशी मिळाली होती पहिली संधी

आज राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गुलजार त्या काळात मुंबईतील एका गॅरेजमध्ये काम करत होते. त्यांना पहिलं काम कसं मिळालं जाणून घ्या.

आज राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गुलजार त्या काळात मुंबईतील एका गॅरेजमध्ये काम करत होते. त्यांना पहिलं काम कसं मिळालं जाणून घ्या.

आज राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गुलजार त्या काळात मुंबईतील एका गॅरेजमध्ये काम करत होते. त्यांना पहिलं काम कसं मिळालं जाणून घ्या.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 18 ऑगस्ट: हिंदी सिनेमातील प्रसिद्ध आणि दिग्गज गीतकार म्हणजे गुलजार.  त्यांच्या अजरामर गीतांनी, अप्रतिम कथांनी प्रेक्षकांची मन जिंकली. त्यांनी लिहिलेल्या शब्दांची दखल शासन दरबारी घेत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. चाहते प्रेमानं त्यांना गुलजार साहब म्हणतात. असे सर्वांचे लाडके गुलजार साहेब आज त्यांचा  87 वा वाढदिवस साजरा करत आहे. गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी झाला.  गुलजार केवळ चांगले गीतकारच नाही तर उत्तर संवाद लेखक, पटकथा लेखक आणि उत्तम दिग्दर्शकही आहेत.  हिंदी सिनेमांवर त्यांनी त्यांच्या लेखनाची विशेष छाप सोडली आहे. गुलजार यांचं पूर्ण नाव सिंग कालरा असं आहे. त्यांच्या वडिलांनी दोन लग्न केली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे गुलजार हे एकुलते पुत्र. त्याच्या वडिलांचं नाव माखन सिंग कालरा तर आईचं नाव सुजान कौर असं होतं.  मात्र गुलजार यांना आईचं सुख फार कमी मिळालं. फार लहान वयात गुलजारांच्या आईचं निधन झालं.  त्यानंतर झालेल्या भारताच्या फाळणीवेळी गुलजार यांचा संपूर्ण परिवार पंजाबच्या अमृतसर येथे स्थलांतर झाला आणि त्यांच्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला.  इथे आल्यानंतर गुलजार कामाच्या शोधात होते. काम शोधत शोधत ते मुंबईत आले. आज राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गुलजार त्या काळात मुंबईतील एका गॅरेजमध्ये काम करत होते. हेही वाचा - Sachin Pilgaonkar B'day: गालावरच्या खळीनं केलं क्लीनबोल्ड! तुम्हाला माहितेय का सचिन-सुप्रियांची Love Story गुलजार यांना लहानपणापासूनच कविता आणि शेरो शायरी करण्याची विशेष आवड. कामातून वेळ मिळाला की ते शायरी लिहायचे, कविता करायचे.  त्यांच्या गॅरेजच्या जवळ एक बुकस्टोर होतं तिथे त्या काळात आठ आण्याला पुस्तक वाचायला मिळायचं.  ते पुस्तक गुलजार घ्यायचे आणि आवडीनं वाचत बसायचे.  तिथेच त्यांना शिकवण्याची आवड निर्माण झाली होती. गुलजार ज्या गॅरेजमध्ये काम करायचे तिथे एकदा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विमल रॉय यांची गाडी दुरुस्त करण्यासाठी आली. योगायोगानं गुलजार आणि विमल रॉय यांची भेट झाली. तिथे विमल यांनी गुलजार यांची पुस्तकं पाहिली. पुस्तकं पाहून त्यांनी गुलजार यांना 'ही पुस्तक कोण वाचत?' असा प्रश्न केला.  तेव्हा गुलजार म्हणाले, 'मी वाचतो'. त्यानंतर विमल यांनी गुलजार यांच्याकडे पाहिलं. या मुलामध्ये काहीतरी वेगळंपण आहे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी गुलजार यांना त्यांचा नंबर दिला आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं. हेही वाचा - Hrithik Roshan : भारताचा सुपरहिरो परतणार; हृतिक रोशनचा 'क्रिश 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार गुलजार विमल रॉय यांच्या आठवणीत आजही भावूक होतात. त्यांच्यामुळेच त्यांना पहिलं काम मिळालं होतं.  त्यांनी विमल यांची आठवण सांगताना म्हटलं होतं, 'मी दुसऱ्या दिवशी विमल यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला उद्यापासून गॅरेजमध्ये काम करणं बंद कर असं सांगितलं.  त्यानंतर मी त्यांच्याबरोबर राहू लागलो. त्यांचा माझ्यावर फार प्रभाव आहे'. 1963मध्ये  आलेल्या  विमल रॉय यांच्या 'बंदिनी' या सिनेमातील सगळी गाणी गुलजार यांनी लिहिली होती. बंदिनी सिनेमातील 'मोरा गोरा अंग लेई ले', 'मोहे श्याम रंग देई दे' ही गाणीत्यावेळी चांगलीच प्रसिद्ध झाली. गाण्यांमुळे गुलजार यांचं कौतुक झालं. आणि तिथून गुलजार यांचा सुरू झालेला प्रवास आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. बंदिनीनंतर गुलजार यांनी अनेक हिंदी सिनेमांसाठी संवाद लिहिले, अनेक सिनेमांच्या पटकथा लिहिल्या. 1973मध्ये गुलजार यांनी अभिनेत्री राखी बरोबर लग्न केलं. त्यांना मेघना गुलजार ही मुलगी आहे. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. मेघना दोन वर्षांची असतानाच त्यांचा घटस्फोट झाला.  गुलजार यांना कलासृष्टीत मोलाची कामगिरी आणि अजरामर लिखाणासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. गुलजार यांना आतापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी, पद्म भूषण पुरस्कार मिळाला आहे. 2008मध्ये आलेल्या स्लमडॉग मिलेनियर सिनेमातील जय हो या गाण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. तर 2012मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे.
First published:

Tags: Bollywood, Bollywood News

पुढील बातम्या