मुंबई, 27 जुलै : दिवंगत निर्माते आणि कॅसेट सम्राट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावरील सिनेमाची निर्मिती करण्याची घोषणा त्याचा मुलगा भूषण कुमारने केली होती. या सिनेमात काम करण्यासाठी अक्षय कुमारला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र निर्मात्यांशी काही मुद्द्यावर बिनसल्याने हा सिनेमा त्याने सोडला. त्यावेळी तुझ्याहून मोठ्या स्टारला या सिनेमात कास्ट करेन असं त्याने अक्षयला बजावलं होतं. अखेर भूषण यांनी या सिनेमासाठी आमिर खानला विचारणा केल्याचं समजतंय. आणि आमिरनं होकारही दिलाय.
या सिनेमाचं नाव आहे 'मोगुल'. गुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असणार असल्याचं बोललं जातं. आमिर खान बायोपिकची निर्मिती करणार असल्याचे समजल्यापासून तोच गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार हे तक नक्की. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरुवात होणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होईल.
टी सीरीज आणि 'आमिर खान प्राॅडक्शन' या सिनेमाची निर्मिती करणार आहे. गुलशन कुमार यांचं आयुष्य अनेक घटनांनी व्यापलं होतं. त्यामुळे सिनेमाबद्दल उत्सुकता आहेच.
हल्ली बाॅलिवूडमध्ये बायोपिक चांगली चालतात, हे दिसलंय. लोकांना चरित्र बघायला आवडतात. संजू तर आताचं उदाहरण आहे. याआधीही धोनी, मेरा काॅम हे सिनेमे खूप चालले होते. त्यामुळे आता आमिर खान मोगुल सिनेमाला योग्य न्याय देईल यात काही शंका नाही.
गुलशन कुमारची मुलगी तुलसीला वडिलांच्या भूमिकेसाठी अक्षयच हवा होता. पण अक्षयचं काही बिनसलं होतं. त्यानंतर सलमानचं नाव पुढे आलं. पण आता हा शोध अखेर थांबला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा