मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रसिद्ध अभिनेत्रीला किस करत होते गुलशन ग्रोव्हर; बिग बींनी रंगेहाथ पकडताच दिली अशी रिऍक्शन

प्रसिद्ध अभिनेत्रीला किस करत होते गुलशन ग्रोव्हर; बिग बींनी रंगेहाथ पकडताच दिली अशी रिऍक्शन

 गुलशन ग्रोव्हर

गुलशन ग्रोव्हर

बॉलिवूडचा बॅड मॅन अशी ओळख असलेले अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांना अमिताभ यांनी एका अभिनेत्रीला किस करताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर जे घडलं त्याची आजही चर्चा होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 21 मार्च : बॉलिवूडचा बॅड मॅन अशी ओळख असलेले अभिनेते  म्हणजे गुलशन ग्रोव्हर. त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं आहे. पण एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सोबत घडलेल्या त्या प्रसंगामुळे गुलशन ग्रोव्हर चांगलेच चर्चेत आले होते.  कतरिना कैफ आज बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री असली तरी पदार्पणात तिला फार प्रसिद्धी मिळू शकली नाही. तिने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.  काही प्रेक्षकांच्या असा समज आहे कि,  कतरिना कैफने 2005 मध्ये आलेल्या 'सरकार' या चित्रपटातून पदार्पण केले होते. पण असे नसून कतरिनाने  2003 मध्ये आलेल्या 'बूम' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात गुलशन ग्रोव्हर देखील होते. त्यांच्यासोबत अभिनेत्रीचा घडलेला एक प्रसंगाची आजही  चर्चा होते.

'बूम' चित्रपटात गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना कैफ यांच्यात एक किसिंग सिन दाखवण्यात आला आहे, ज्याविषयी या अभिनेत्याने एकदा भाष्य केलं होतं. हे दोघे त्या किसिंग सीनसाठी रिहर्सल करत असताना जे घडलं होतं त्याची चांगलीच चर्चा झाली होती. कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर तो किसिंग सिन रिहर्सल करत असताना तिथे अचानक अमिताभ बच्चन रूममध्ये आले. 'इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, किसिंग सीन चित्रित करण्यापूर्वी कतरिना आणि गुलशन जवळपास 2 तास बंद खोलीत त्याची रिहर्सल करत होते आणि तेव्हाच तिथे अमिताभ बच्चन यांनी एंट्री घेतली.

Bhumika Chawala: सलमानची हिरॉईन म्हणून हिट; मग अचानक इंडस्ट्रीतून झाली गायब; आता काय करते ही अभिनेत्री?

'बूम'च्या या सीनबद्दल गुलशन ग्रोव्हर यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता. अभिनेत्याने या सीनला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण सीनपैकी एक म्हटले होते. दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये हे दृश्य शूट करण्यासाठी टीमकडे फक्त दोन तास होते. अभिनेत्याने सांगितले होते की, तो या सीनसाठी रिहर्सल करत असताना अमिताभ अचानक रूममध्ये आले आणि दोघांना बघून टाळ्या वाजवू लागले. अमिताभ यांनी दिलेलय त्या प्रतिक्रियेमुळे गुलशन यांना अधिक टेन्शन आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा कतरिना कैफला या सीनबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्री म्हणाली, 'यावर मी काय प्रतिक्रिया देऊ? त्या सीन्समध्ये नवीन काय आहे. इंटरनेटवर 'बूम' सर्वत्र उपलब्ध आहे. मी ते नाकारत नाही. मी याआधीही असे सीन्स केले आहेत, पण त्यावेळी मी फार कंफर्टेबल नव्हते.' असं ती म्हणाली होती.

त्यावेळी सलमान खानच्या सांगण्यावरून चित्रपटाच्या सुरुवातीच्या डीव्हीडीमधून गुलशन ग्रोव्हरसोबतचे कतरिनाचे किसिंग सीन काढून टाकण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. जॅकी श्रॉफ, मधु सप्रे आणि झीनत अमान यांसारख्या स्टार्सनीही 'बूम'मध्ये काम केले होते. एवढ्या छोट्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली कतरिना आज बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News