'या' 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन दिल्यानं वादात सापडला होता 'बॅडमॅन'

'या' 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन दिल्यानं वादात सापडला होता 'बॅडमॅन'

बॉलिवूडचा बॅडमॅन म्हणजेच अभिनेता गुलशन ग्रोवर आज 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : बॉलिवूडचा बॅडमॅन म्हणजेच अभिनेता गुलशन ग्रोवर आज 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. खलनायकाच्या भूमिका साकारुनही या अभिनेत्यानं स्वतःचा वेगळा चाहता वर्ग तयार केला होता. जो आजतागायत कायम आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्याच्या बॉलिवूड करिअरमधील असा किस्सा सांगणार आहोत जो फार कमी लोकांना माहित आहे. 2003 साली आलेल्या बूम सिनेमात गुलशन ग्रोवर यांनी अभिनेत्री कतरिना कैफसोबत बोल्ड सीन दिला होता. ज्यामुळे त्याच्यावर खूप टीकाही झाली होती. मात्र हा सीन गुलशन यांच्यासाठीही फारसा सोपा नव्हता. त्यावेळी ते खूपच नर्व्हस होते.

कतरिनानं 2003 मध्ये 'बूम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं होतं. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता मात्र या सिनेमातील कतरिनाआणि गुलशन ग्रोवर यांनी दिलेल्या बोल्ड सीनची चर्चा मात्र फार झाली होती. बोल्ड सीन व्यतिरिक्त कतरिनानं गुलशन ग्रोवर सोबत दिलेला किसिंग सीन सुद्धा विशेष गाजला होता.

पैशाअभावी झाला रुमा देवींच्या मुलाचा मृत्यू, असं बदललं 22 हजार महिलांचं आयुष्य

‘बूम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणाऱ्या कतरिनानं पदार्पणातच अभिनेता गुलशन ग्रोवर सोबत लिपलॉक सीन दिला होता. या सीनची सर्वत्र खूप चर्चा तर झालीच शिवाय हा सीन प्रचंड वादातही सापडला होता. असा सीन शूट करणं खरं तर गुलशन यांच्यासाठीही सोपं नव्हतं. याचा खुलासा गुलशन ग्रोवर यांनीच त्यानंतर दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केला होता.

रामायणातील प्रश्नावर सोनाक्षीचं अजब उत्तर, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली

गुलशन यांनी ‘बूम’ सिनेमातील कतरिनासोबतचा किसिंग सीन त्यांच्या करिअर मधील सर्वात कठीण सीन असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी ते एकटेच एका बंद खोलीमध्ये प्रॅक्टीस करत असत. असंच एक दिवस त्याठिकणी अमिताभ बच्चन गुलशन यांना भेटायला आले होते. मात्र गुलशन यांना प्रॅक्टीस करताना पाहून ते निघून गेले. बिग बी निघून गेल्यानंतर या सीनबाबत माझ्यावर असलेला ताण अधिकच वाढला होता असंही या मुलाखतीमध्ये गुलशन यांनी सांगितलं होतं.

सैफच्या अगोदर 'या' मिस्टर खानवर जडला होता करीनाचा जीव

========================================================

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 03:29 PM IST

ताज्या बातम्या