प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, दोन दिवसापूर्वीच झाला होता संगीतकार भावाचा मृत्यू
नरेश कनोडिया (Naresh Kanodia) कोरोनामुळे संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) च्या यूएन मेहता इंस्टीट्यूट (UN Mehta Institute)मध्ये उपचार सुरू होते.
मुंबई, 27 ऑक्टोबर : गुजराती सिनेमातील सुपरस्टार नरेश कनोडिया (Naresh Kanodia) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) च्या यूएन मेहता इंस्टीट्यूट (UN Mehta Institute) मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गुजराती फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अभिनेता नरेश कनोडिया यांची गुजराती इंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन अशी ओळख आहे. त्यांनी गुजराती भाषेत शेकडो सिनेमा केले आहेत. त्यांचा मुलगा हितू कनोडिया देखील गुजराती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे तर भाऊ महेश कनोडिया (Mahesh Kanodia) हे भाजपचे राज्यसभा सदस्य होते. महेश हे उत्तम संगीतकार आणि गीतकार होते. महेश-नरेश या जोडीने काही चित्रपटांना संगीत दिले होते. दोन दिवसांपूर्वी महेश यांचा मृत्यू झाला होता. ते 83 वर्षांचे होते. महेश यांच्या निधनांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला होता.
महेश कनोडिया जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। वे एक बहुमुखी प्रतिभासंपन्न गायक थे, जिन्हें लोगों का भरपूर प्यार मिला। एक राजनेता के रूप में भी वे गरीबों और पिछड़ों के सशक्तिकरण के लिए समर्पित रहे। हितु कनोडिया जी से मैंने बात की और उनके परिजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की।
गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्वीट करून नरेश यांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'गुजराती चित्रपटांचे सुपरस्टार आणि भाजप नेता नरेश भाई कनोडिया यांच्या निधनामुळे मला अत्यंत दु:ख झाले आहे. सामाजिक आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान नवीन पीढीला प्रेरणा देईल.'
महेश कनोडिया यांच्या मृत्यू वृद्धापकाळातील आजारामुळे 83व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचा भाऊ नरेश कनोडिया यांचे कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुजरात फिल्म इंडस्ट्रीसाठी या दोन्ही घटना धक्कादायक आहेत. इंडस्ट्रीतील दोन महत्त्वाचे तारे निखळल्याचे दु:ख अनेकांनी व्यक्त केले आहे.