Home /News /entertainment /

‘आमच्या भावनांशी खेळणं थांबवा’; ‘Ramyug’ पाहून दिग्दर्शक गुफी संतापले

‘आमच्या भावनांशी खेळणं थांबवा’; ‘Ramyug’ पाहून दिग्दर्शक गुफी संतापले

‘रामयुग’(Ramyug)पाहून प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते गुफी पेंटल (Gufi Paintal)संतापले आहेत. आमच्या देवांचं तुम्ही हे काय करुन टाकलं असा सवाल त्यांनी निर्मात्यांना केला आहे.

    मुंबई 22 मे: भगवान श्री राम यांच्या पौराणिक कथेवर आजवर अनेक मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. राम रावणाचा वध कसा करतात? सीतेचं हरण कसं केलं जातं? या गोष्टी भारतीय प्रेक्षकांनी अनेकदा पाहिल्या आहेत. मात्र तरी देखील तीच कथा पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न एमएक्स प्लेअरच्या ‘रामयुग’ (Ramyug) या वेब सीरिजमध्ये करण्यात आला. मात्र हा प्रयत्न पाहून प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते गुफी पेंटल (Gufi Paintal) संतापले आहेत. आमच्या देवांचं तुम्ही हे काय करुन टाकलं असा सवाल त्यांनी निर्मात्यांना केला आहे. गुफी यांनी वन द टॉकला दिलेल्या मुलाखतीत रामयुग या सीरिजवर भाष्य़ केलं. ते म्हणाले, “या सीरिजच्या निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करुन महागडे सेट, स्पेशल इफेक्ट, कॉच्शूम वगैरे तयार केले. पण रामायणावर संशोधन मात्र करायला ते विसरले. मी लहानपणी गावातील जत्रेत अनेकदा रामलीला पाहिली आहे. पण तीच कथा पुन्हा पुन्हा पाहून मी कधी कंटाळलो नाही. कारण त्यामध्ये भक्तीभाव होता. यामध्ये मात्र तसं काही नाही. यामध्ये केवळ ग्लॅमरचा तडका दिसतो. भगवान श्री राम यांना पाहून आनंद वाटायला हवा पण या सीरिजमधील राम ही व्यक्तिरेखा पाहून दु:ख होतं. आमच्या लाडक्या देवांचं तुम्ही हे काय केलं?” असं ते म्हणाले. MBBS डॉक्टर झाली सुपरमॉडेल; पाहा आदिती गोव्हित्रीकर 45व्या वर्षी दिसते कशी? ‘रामयुग’ ही एक बिग बजेट सीरिज आहे. या सीरिजमध्ये मोठ्य़ा प्रमाणावर स्पेशल इफेक्टचा वापर करण्यात आला आहे. याची एक झलक आपण ट्रेलरमध्ये देखील पाहू शकतो. शिवाय युद्ध करण्याची शैली, शस्त्र आणि सिनेमेट्रोग्राफीमध्ये देखील प्रचंड काम करण्यात आलं आहे. परंतु तरी देखील काही प्रेक्षकांनी या सीरिजवर नाराजी व्यक्त केली. टीकाकारांना यामधील कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद आवडले नाहीत. “तुम्ही आमच्या देवांचं हे काय केलं आहे? हे देव आहेत की राक्षस?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही प्रेक्षकांनी जोरदार टीका केली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Social media troll, Web series

    पुढील बातम्या