जीएसटीमुळे प्रेक्षकांनी फिरवली नाटकांकडे पाठ

जीएसटीमुळे प्रेक्षकांनी फिरवली नाटकांकडे पाठ

हे. नाटक, लावणी आणि ऑर्केस्ट्राच्या तिकीटांवर केंद्र सरकारने 18 टक्के जीएसटी कर लावल्याने प्रेक्षकांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

23 जुलै : जीएसटीचा फटका आता लोक कलावंत आणि निर्मात्यांना ही बसला आहे. नाटक, लावणी आणि ऑर्केस्ट्राच्या तिकीटांवर केंद्र सरकारने 18 टक्के जीएसटी कर लावल्याने प्रेक्षकांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. यामुळे पुण्यातील बाल गंधर्वसह सर्वच नाट्यगृह जवळपास ओस पडली आहेत.

तिकीटांवर 18 टक्के जीएसटी कर लावल्याने लावणी आणि नाटक सारख्या मनोरंजन कार्यक्रमाची तिकीट चागलीच महागली आहेत.

तिकीट महाग झाल्याने प्रेक्षक कार्यक्रमात येत नसल्याने अंगभुत कला असलेल्या कलकारावर बेरोजगारीची वेळ ओढवन्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जीएसटी लागू होण्यापूर्वी पुण्यातील बहुतेक नाट्यगृह खचाखच गर्दी भरून असायची मात्र आता सर्वच नाट्यगृहात शुकशुकाट निर्माण झालाय. नाट्यगृह बुक करण्याचा, कलाकाराना मानधन देण्याचा, आणि कार्यक्रम आयोजित करण्याचा खर्च करायचा का जीएसटी तिकीटाचा हिशेब ठेवायचा असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. अडीचशे रूपया पर्यंतच्या तिकीटांना जीएसटीमधून सूट आहे. ती मर्यादा 700 रुपयांपर्यंत करण्याची मागणी नाट्य क्षेत्राकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 06:38 PM IST

ताज्या बातम्या