गोविंदाची भोजपुरी सिनेमात एन्ट्री

गोविंदाची भोजपुरी सिनेमात एन्ट्री

या आगामी सिनेमात गोविंदासोबत अभिनेत्री संभावना सेठ काम करणार असल्याचंही बोललं जातयं. या सिनेमाचा मुहूर्त मुंबईच्या मड आयलँडच्या नंदावन इथे करण्यात आला आहे.

  • Share this:

30 नोव्हेंबर : एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अभिनेता गोविंदाचं राज्य होतं. परंतु अनेक वर्षांपासून गोविंदा सिनेसृष्टीपासून लांब आहे. बॉलिवूडमधल्या त्याच्या घसरत्या करिअरमुळे त्याने आता भोजपुरी सिनेसृष्टीत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार गोविंदा भोजपुरीतल्या एका आगामी सिनेमात झळकणार आहे. हिंदी सिनेमांत तर आपण गोविंदाचा हटके डांन्स पाहिलाच आहे, पण आता त्याची तीच हटके स्टाईल आपल्याला भोजपुरीतही पहायला मिळणार आहे.

या आगामी सिनेमात गोविंदासोबत अभिनेत्री संभावना सेठ काम करणार असल्याचंही बोललं जातयं. या सिनेमाचा मुहूर्त मुंबईच्या मड आयलँडच्या नंदावन इथे करण्यात आला आहे.

आता भोजपुरी सिनेसृष्टीला एक नवीन अभिनेता मिळणार हे नक्की. गोविंदाबरोबर अभिनेता राघव नय्यरही या सिनेमा पदार्पण करणार आहे. या सिनेमात गोविंदासोबत मुख्य भूमिकेत शिप्रा गौरही झळकणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन प्रेमांशु सिंह करणार आहे. या सिनेमात अनेक मोठे कलाकार काम करणार असल्याच्या चर्चा रंगत असल्यामुळे लवकरच सिनेमाची स्टार कास्ट जाहीर करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जातंय.

या सिनेमाच्या शूटिंगसाठी सगळी टीम गुजरातच्या हल्लोस इथे रवाना झाली आहे. त्यामुळे लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल आणि गोविंदाचा नवा लूक आपल्याला या सिनेमातून पहायला मिळणार आहे.पण आता या नव्या सुरुवातीमुळे गोविंदाचं करिअर काय वळण घेणार? बरं त्याचा हा सिनेमा गाजणार का ? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

First published: November 30, 2017, 4:33 PM IST

ताज्या बातम्या