गोविंदाने मानले ऋषी कपूर यांचे आभार

गोविंदाने मानले ऋषी कपूर यांचे आभार

गोविंदाचा जग्गा जासूसमधला रोल कट केल्याबद्दल ऋषी कपूर यांनी जग्गा जासूसचे दिग्दर्शक अनुराग बासू यांची कानउघडणी केली होती.

  • Share this:

26जुलै: जग्गा जासूसबाबत गोविंदाची बाजू ऋषी कपूर यांनी घेतल्यामुळे गोविंदाने त्यांचे आभार मानलेत. गोविंदाचा जग्गा जासूसमधला रोल कट केल्याबद्दल ऋषी कपूर यांनी जग्गा जासूसचे दिग्दर्शक अनुराग बासू यांची कानउघडणी केली होती.

जग्गा जासूसमध्ये गोविंदाने एक स्पेशल अॅपियरन्स केला होता. गोविंदाचा हा रोल अनुराग बासू यांनी कट केला होता. अनुराग बासू यांच्या अनप्रोफेशनल वागणूकीबद्दल ऋषी कपूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

ऋषी कपूरांनी गोविंदाची बाजू घेतल्यामुळे गोविंदा खूश झाला. त्याने ऋषी कपूर यांचे आभार मानले. त्याचवेळी अनुराग बासूबद्दल विचारलं असता तो म्हणाला, 'कोणाचा रोल ठेवायचा आणि कुणाचा नाही, हा निर्णय दिग्दर्शकाचाच. पण थोडं प्रोफेशनली वागलं पाहिजे. मला त्यांनी कळवलंही नाही. मला ताप असताना मी दक्षिण आफ्रिकेत शूटिंगसाठी गेलो होतो. पण मी आता धडा शिकलोय. कुणालाही मी आता हो म्हणणार नाही आणि कामाच्या बाबतीत भावनिक होणार नाही'.

First published: July 26, 2017, 9:46 AM IST

ताज्या बातम्या