गोविंदानं नाकारली 'या' मोठ्या हॉलिवूड सिनेमाची ऑफर, कारण...

गोविंदानं नाकारली 'या' मोठ्या हॉलिवूड सिनेमाची ऑफर, कारण...

सुपरस्टार गोविंदानं आतापर्यंत फक्त बॉलिवूडचे सिनेमेच नाही तर हॉलिवूडचाही सुपरहिट सिनेमा नाकारला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : बॉलिवूडचा सुपस्टार, कॉमेडी किंग आणि डान्सिंगचा बादशाह गोविंदा सध्या सिनेमांपासून लांब असला तरीही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. आतापर्यंत त्यानं अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण यासोबतच त्यानं अनेक बॉलिवूड सिनेमे सुद्धा नाकारले जे पुढे सुपरहिट ठरले. तसेच या अभिनेत्याला हॉलिवूडच्या एका ब्लॉकबस्टर सिनेमाची ऑफर आली होती मात्र त्यानं ती नाकरली. या गोष्टीचा खुलासा स्वतः गोविंदानेच केला एका मुलाखतीत केला आहे. कुणाला विश्वास बसणार नाही पण या सिनेमाचं नावही गोविंदानं सुचवलं होतं.

अनुष्का शर्मानं प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली...

गोविंदानं सीनिअर जर्नलिस्ट रजत शर्माच्या टॉक शोमध्ये हॉलिवूडच्या त्या सिनेमाविषयीचा खुलासा केला जो त्यानं नाकारला. मात्र या सिनेमासाठी त्यानं सुचवलेलं नाव मात्र दिग्दर्शकांनी कायम ठेवलं. गोविंदा म्हणाला, दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी त्यांचा ब्लॉक बस्टर सिनेमा ‘अवतार’साठी मला विचारलं होतं मात्र मी हा सिनेमा नाकरला. पण मी या सिनेमासाठी सुचवलेलं नाव मात्र जेम्स यांनी तसंच ठेवलं.

दाऊदच्या जवळीकीमुळे सर्वस्व गमावलं, आज सर्वांपासून दूर आहे राज कपूर यांची ‘गंगा’

गोविंदा पुढे म्हणाला, मी या सिनेमाला टायटल दिलं आणि हा सिनेमा सुपरहीट झाला. मी कॅमेरून यांना हेही सांगितलं होतं की, हा सिनेमा चांगली कमाई करेल मात्र संपूर्ण सिनेमा तयार करण्यासाठी त्यांना 7 वर्ष लागतील. यावर त्यांनी विचारलं, तुम्ही इतक्या विश्वासानं कसं काय सांगू शकता की, हा सिनेमा तयार करण्यासाठी 7 वर्ष लागणार आहेत. त्यावर मी म्हटलं, ज्याचा तुम्ही विचार करत आहात ते काम अशक्यप्राय आहे. विशेष म्हणजे मी सांगितल्या प्रमाणे, हा सिनेमा 8 ते 9 वर्षांनी रिलीज झाला आणि सुपरहिट सुद्धा ठरला.

‘अवतार’ नाकारण्याचं कारण सुद्धा गोविंदानं यावेळी स्पष्ट केलं. तो म्हणाला, मी हा सिनेमा यासाठी नाकरला कारण, कॅमेरुन यांचं म्हणणं असं होतं की मी 410 दिवस बॉडीवर पेंट करून शूट करावं आणि हे करणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. त्यामुळे हा सिनेमा नाकारला. पण यानंतरही जेम्स आणि माझे संबंध खूप चांगले राहीले. यामागचं आणखी एक कारण होतं की, मी हासिनेमा साइन केला असता तर तो 410 दिवसातच पूर्ण करण्याचा माझा विचार होता मात्र त्यावेळी ते अजिबात शक्य नव्हतं.

देसी गर्लसाठी डोकेदुखी ठरलं मियामी व्हेकेशन, सर्वच फोटो ठरले वादग्रस्त

गोविंदाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर गोविंदा शेवटचा रंगिला राजा या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. सध्या गोविंदाकडे, 'भगवान के लिए मुझे छोड़ दो' आणि 'पिंकी डार्लिंग एंड नेशनल हीरो' हे दोन सिनेमे आहेत. मात्र या सिनेमांबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

================================================

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या