कादर खान यांच्या सोबत काम करणारा सुपरस्टार बनायचा - गोविंदा

कादर खान यांच्या सोबत काम करणारा सुपरस्टार बनायचा - गोविंदा

अभिनेता गोविंदा आणि कादर खान यांनी मिळून अनेक सिनेमे केलेत. त्यांच्या निधनावर गोविंदानं दु:ख व्यक्त केलंय.

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी : वर्षाची सुरुवात बाॅलिवूडला धक्का देऊन गेली. ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड गेले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेता गोविंदा आणि कादर खान यांनी मिळून अनेक सिनेमे केलेत. त्यांच्या निधनावर गोविंदानं दु:ख व्यक्त केलंय. तो म्हणाला, 'ते आता आपल्यात नाहीत. ते माझे फक्त गुरू नाही, तर वडीलच होते. ते लकी होते. त्यांच्या सोबत जो कलाकार काम करायचा तो सुपरस्टार बनायचा. आम्ही सगळेच आता दु:खात आहोत. ते शब्दात मांडता येणार नाही. '

गोविंदा आणि कादर खान यांनी मिळून बरेच हिट सिनेमे दिले. दूल्हे राजा, राजा बाबू, कुली नंबर 1, राजाजी, आंखे, छोटे सरकार, साजन चले ससुराल, आंटी नंबर 1, जोरू का गुलाम, अनाडी नंबर 1 असे हिट सिनेमे होते. दोघांची विनोदाची जुगलबंदी चांगलीच रंगायची.

अमिताभ यांच्या कारकिर्दीतील मिस्टर नटवरलाल, सत्ते पे सत्ता, इन्कलाब, अग्नीपथ आणि नसीब या सिनेमांचं लेखन कादर खान यांचं होतं. तर त्यांच्यासोबतच अनेक सिनेमांमध्ये खान यांनी कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे अमिताभ यांच्या व्यतिरिक्त मनमोहन देसाई आणि मनोज देसाई या परस्पर विरोधी कँप्समध्ये एकाच वेळी काम करणारे ते एकमेव लेखक होते.

१९८२ साली त्यांना मेरी आवाज सुनो या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९१ साली सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर १९९३ साली आलेल्या अंगार या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर तब्बल ९ वेळा वेगवेगळ्या विभागात त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं.

'तो' एक दिवस आणि कॉलेजमध्ये शिक्षक असणाऱ्या कादर खान यांचं आयुष्यच बदललं

First published: January 1, 2019, 7:28 PM IST

ताज्या बातम्या