मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: गोविंदा-करिश्माच्या 'तुझको मिर्ची लगी तो.. ' वरुण-साराची कम्माल!

VIDEO: गोविंदा-करिश्माच्या 'तुझको मिर्ची लगी तो.. ' वरुण-साराची कम्माल!

90 च्या दशकाचा नॉस्टेल्जिया असलेल्या या गाण्यावर सारा अली खान आणि वरुण धवनने काय धम्माल केली आहे त्याची झलक पाहा VIDEO

90 च्या दशकाचा नॉस्टेल्जिया असलेल्या या गाण्यावर सारा अली खान आणि वरुण धवनने काय धम्माल केली आहे त्याची झलक पाहा VIDEO

90 च्या दशकाचा नॉस्टेल्जिया असलेल्या या गाण्यावर सारा अली खान आणि वरुण धवनने काय धम्माल केली आहे त्याची झलक पाहा VIDEO

  मुंबई, 21 डिसेंबर :  बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि वरुन धवन (Varun Dhawan) यांच्या आगामी 'कुली नंबर वन'(Coolie No. 1) या चित्रपटातील 'तुझको मिर्ची लगी' (Mirchi Lagi Toh) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये सारा आणि वरुण यांची अतिशय सुंदर केमिस्ट्री दिसून येत असून 90 च्या दशकातील आठवणी देखील ताज्या झाल्या आहेत. गोविंदा आणि करिश्मा कपूरने गाजवलेल्या या गाण्यात सारा आणि वरुण काय धम्माल करतात ते खालच्या VIDEO तून कळेल. या गाण्यामध्ये दोघंही छान नाचले आहेत. गाणं रिलीज झाल्यानंतर लगेच त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या आणि ते व्हायरल झालं आहे.  1995 मध्ये आलेल्या कुली नंबर वन या ओरीजिनल चित्रपटात या गाण्यावर अभिनेता गोविंदा (Govinda) आणि करिष्मा कपूर (Karishma Kapoor) यांनी भन्नाट डान्स केला होता. वरूण धवनने आपल्या इंस्टाग्राम(Instagram) अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. हे गाणं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलं आहे. या गाण्याला लिजो जॉर्ज आणि डीजे चेतास यांनी मिक्स केलं असून जुन्या गाण्याचे गीतकार समीर (Sameer) यांनीच याचेदेखील बोल लिहिले आहेत. तर संगीतकार आनंद-मिलिंद यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. त्यामुळे जुन्या गाण्याप्रमाणेच हे गाणं देखील चाहत्यांना आवडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वरून धवन याने याचा व्हिडीओ शेअर करत #MirchiLagiToh song out now! असे कॅप्शन दिल आहे. त्याचबरोबर हे गाणं पुन्हा आलं असून मी ते 2020 मध्ये केलं आहे असंही त्यानं म्हटलं. येत्या 25 डिसेंबरला म्हणजेच नाताळच्या दिवशी हा चित्रपट ऑनलाईन रिलीज होणार आहे. अमेझॉन प्राईम (Amazon Prime) या ऑनलाईन ओटीटी(OTT Platform) प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by VarunDhawan (@varundvn)

  या गाण्याविषयी बोलताना चित्रपटाचे डायरेक्टर डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी हे खूप लोकप्रिय गाणं असल्याचं म्हटलं आहे. या गाण्यामुळं जुन्या चित्रपटाला देखील मदत झाल्याचं त्यांनी म्हटलं. भविष्यात मी या चित्रपटाचा रिमेक तयार करेन त्यावेळी मी हे गाणं नवीन चित्रपटात वापरणार असल्याचं त्यावेळीच ठरवलं होतं. त्यामुळं या चित्रपटाला देखील या गाण्याचा खूप फायदा होईल. मूळ गीतकार समीर(Sameer ) आणि संगीतकार आनंद मिलिंद (Anand -Milind) यांच्याबरोबर मी खूप काम केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळं त्याची परतफेड म्हणून मी हे गाणं या नवीन चित्रपटात देखील समाविष्ट करून त्यांची परतफेड केल्याचं देखील डेव्हिड धवन यांनी या वेळी स्पष्ट केलं. त्यामुळं आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Sara ali khan, Varun Dhawan

  पुढील बातम्या