मानसिक आजाराने त्रस्त गोविंदा? जवळच्या मित्राने केला खुलासा

सिनेसृष्टीत आज त्याचे कोणीही मित्र नाहीत आणि त्याच्या मदतीसाठीही कोणी पुढे येत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 01:34 PM IST

मानसिक आजाराने त्रस्त गोविंदा? जवळच्या मित्राने केला खुलासा

मुंबई, 04 ऑगस्ट- काही दिवसांपासून गोविंदा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आपल्या वक्तव्यांमुळे त्याला नेटिझन्सनी ट्रोल केलं होतं. आपल्या वक्तव्यामध्ये गोविंदाने म्हटलं होतं की, 2009 मध्ये हॉलिवूडपट अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी गोविंदाला विचारले होते. मात्र गोविंदाने हा सिनेमा करण्यास स्पष्ट नकार दिला होता. नकार देण्याचं कारण देताना त्याने म्हटलं होतं की, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो 410 दिवस देऊ शकत नाही. याशिवाय स्वतःच्या शरिरावर त्याला पेंट करून घ्यायचं नव्हतं. या कारणामुळे त्याने अवतार सिनेमात काम करायला नकार दिला होता. याशिवाय त्याने दिग्दर्शक डेविड धवन यांच्याविरुद्ध दुखावणारे विधान केले. यामुळेही सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता गोविंदाच्या मित्राने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

Satur-Yay! ⚡💪🏻 #bottlecapchallenge #accepted 😎

A post shared by Govinda (@govinda_herono1) on

गोविंदाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की जेम्स कॅमरून यांना अवतार या सिनेमाचं टायटल त्यानेच सांगितलं होतं. या वक्तव्यानंतर गोविंदाची थट्टा उडवण्यात आली. यानंतर त्याच्याशी निगडीत अनेक मिमही व्हायरल झाले. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाच्या अनेक मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतातरी मानसिक आजार असून त्याला मदतीची गरज आहे. त्या मित्राने दावा केला की, मानसिक आजारामुळेच तो अशी वक्तव्य करत आहे.

एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गोविंदा अनेक दिवसांपासून विचित्र वागत आहे. असंही म्हटलं जातं की, त्याच्या नकारात्मक व्यवहारामुळे अनेक डिस्ट्रीब्यूटर त्याच्यावर नाराज झाले आहेत. याचा फटका त्याच्या 'रंगीला राजा' या सिनेमालाही बसला. गोविंदाने डिस्ट्रीब्यूटर्सशी भांडण केलं ज्यामुळे सर्वांनी मिळून गोविंदाला बॉयकॉट केलं.

गोविंदाच्या या मित्राने खुलासा केला की, त्याचं मित्रांसोबतचं वागणंही बदललं. यामुळे सिनेसृष्टीत आज त्याचे कोणीही मित्र नाहीत आणि त्याच्या मदतीसाठीही कोणी पुढे येत नाही. गोविंदाच्या मित्राचा हा खुलासा नक्कीच धक्कादायक आहे. त्याच्या या बोलण्यात किती तथ्य आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. आता यावर गोविंदा काय रिअॅक्शन देतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

मुसळधार पावसामुळे सुबोध भावेचा 3 तास स्टेशनवर खोळंबा, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

या बॉलिवूड अभिनेत्रीने पतीवर केला अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा आरोप

रणवीर सिंगचा शर्टलेस फोटो पाहून हा कॉमेडियन म्हणाला- जब लगावे तू लिपिस्टिक...

पैशांसाठी काहीही कराल का, नेटीझन्स भडकले

VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: govinda
First Published: Aug 4, 2019 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...