बर्थडे स्पेशल - गोविंदाने 36 तासांत केले होते 14 सिनेमे साईन!

बर्थडे स्पेशल - गोविंदाने 36 तासांत केले होते 14 सिनेमे साईन!

21 डिसेंबर 1963ला गोविंदाचा एका पंजाबी कुटुंबात जन्म झाला होता. गोविंदाचे वडिल अरुण कुमार अहूजाही अभिनेते होते. त्याची आई निर्मला देवी अभिनेत्री आणि गायिका होत्या.

  • Share this:

21 डिसेंबर : आपल्या अभिनयानं आणि बिनधास्त स्वभावानं सगळ्यांना हसवणारा, सगळ्यांना नाचायला लावणारा अभिनेता म्हणजे 'हिरो नं. 1' 'गोविंदा'. आज आपल्या या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. गोविंदा आज 53 वर्षांचा झाला आहे.

21 डिसेंबर 1963ला गोविंदाचा एका पंजाबी कुटुंबात जन्म झाला होता. गोविंदाचे वडिल अरुण कुमार अहूजाही अभिनेते होते. त्याची आई निर्मला देवी अभिनेत्री आणि गायिका होत्या. सहा भावंडांमध्ये गोविंदा सगळ्यात लहान होता. सगळे त्याला लाडाने चीची असं म्हणतात. पण मागच्या काही काळापासून गोविंदाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण आजही गोविंदा सगळ्यांच्या मनावर तितकंच राज्य करतोय.

आजच्या या खास दिवशी जाणून घेऊयात गोविंदाचा बॉलिवूडचा प्रवास

- बीकॉम केल्यानंतर गोविंदाने त्याच्या वडिलांच्या सागंण्यावरुन सिनेसृष्टीत काम करायचं ठरवलं. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात 'डिस्को डान्सर' या सिनेमापासून केली.

- या सिनेमानंतर गोविंदाने बराच काळ डान्सचा सराव केला आणि त्यानंतर त्याला कमर्शिअल जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी ऑफर येऊ लागल्या.

- 1986मध्ये गोविंदाचा 'इल्जाम' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. त्याचा हा सिनेमा त्या काळात सुपरहिट झाला आणि गोविंदाची डान्सिंग स्टार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली.

- हिरो नं. 1 मधील डान्सची कॉपी तर आजही लोक करतात. त्या सिनेमातली गोविंदासारखी ड्रेसिंग कोणीही करु शकत नाही. त्याच्यासारखा विनोद ही कोणी नसेल करत.

- गोविंदाबद्दल सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे तो जगभरात इतका प्रसिद्ध झाला की त्याने एकावेळी 40 सिनेमे साईन केले होते.

- बरं मंडळी इतकंच नाही तर 36 तासांमध्ये 14 सिनेमे साईन करण्याचाही विक्रम त्याच्या नावे आहे. पण गोविंदाच्या आयुष्यात एक काळ असाही होता की त्याला 5 वर्षं एकाही सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही. पण त्यातून मार्ग काढत त्याने भोजपुरी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला.

- गोविंदाला त्याच्या उत्तम अभिनयामुळे आणि त्याच्या हटके डान्समुळे मदर तेरेसा पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे.

First published: December 21, 2017, 12:43 PM IST

ताज्या बातम्या