आपलं डिप्रेशन आणि संघर्षावर बनवायचाय गोविंदाला सिनेमा

आपलं डिप्रेशन आणि संघर्षावर बनवायचाय गोविंदाला सिनेमा

गोविंदानं मीडियाशी बोलताना बायोपिकबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

  • Share this:

शिखा धारिवाल, मुंबई, 17 सप्टेंबर : आपल्या काॅमेडी अंदाजात सगळ्यांचं मनोरंजन करणारा अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या 'फ्रायडे' सिनेमाचं प्रमोशन करण्यात बिझी आहे. बाॅलिवूडमध्ये गोविंदाला एका हिटची गरज आहे. गोविंदाला फ्रायडे सिनेमावर बरीच आशा आहे. हा FryDay बाॅक्स आॅफिसवर धमाल करेल, असं गोविंदाला वाटतंय.

गोविंदानं मीडियाशी बोलताना बायोपिकबद्दल आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला,  'माझ्यावर बायोपिक यावा असं मलाही वाटतं. पण त्याला थोडा वेळ घ्यावा लागेल.  पण माझा बायोपिक आला तर मला आनंद नक्कीच होईल.'

गोविंदाला आयुष्यात डिप्रेशन आणि संघर्षाला सामोरं जावं लागलंय. ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायला हवं, असं गोविंदाला वाटतं. कलाकाराच्या आयुष्यातले सगळे पैलू फॅन्सना माहीत हवेत. शिवाय या बायोपिकवरून प्रेक्षकांना प्रोत्साहन मिळेल, असं त्याला वाटतं. गोविंदाकडे सध्या वेळ नाही. पण आपलं आयुष्य मोठ्या पडद्यवर त्याला आणायचंय.

गोविंदाची भूमिका कोण करेल? हा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला अजून याचा विचार केला नाही. काही दिवसांपूर्वी गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकनं न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जर मामा गोविंदावर बायोपिक आलं, तर त्यात गोविंदाची भूमिका त्यालाच करायचीय. मामाच्या भूमिकेसाठी त्याला अजून कोणी योग्य वाटतंच नाही.

दरम्यान,अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्या नात्यातील दुरावा गेल्या २ वर्षांपासून वाढतच चालला आहे. याबद्दल कृष्णा आणि त्याची मामी सुनीता आहुजा यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होते की त्यांचं नातं दिवसेंदिवस बिघडतच चाललं आहे.

'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखती दरम्यान बोलताना सुनीता म्हणाली की, मामा-भाच्याचं नातं सुधारण्याची काही चिन्हे दिसत नाहीयेत. सुनीताने मीडियावर राग व्यक्त करताना म्हटले की, कृष्णाने नेहमी स्वतःला गोविंदाचा भाचा म्हणून फायदा घेतला आहे. आम्हीही त्याला नेहमी आपलं मानत आलो आहोत. मात्र तो आमच्या पाठीमागे आमची निंदा करत असतो. असो.

गोविंदाचा FryDay 12 आॅक्टोबरला रिलीज होतोय. सिनेमात गोविंदाशिवाय वरुण शर्मा, संजय शर्मा यांच्या भूमिका आहेत. फ्रायडेनंतर रंगिला राजही रिलीजसाठी सज्ज आहे.

आता बिग बाॅसच्या घरात पाहायला मिळणार 'या' अभिनेत्रींचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2018 05:14 PM IST

ताज्या बातम्या