VIDEO : रवीनासोबत रोमँटिक गाण्यावर डान्स करत होता गोविंदा आणि...

VIDEO : रवीनासोबत रोमँटिक गाण्यावर डान्स करत होता गोविंदा आणि...

गोविंदा रवीनासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत असून त्यांचा डान्स सुरू असतानाच गोविंदाची पत्नीची एंट्री होताना दिसते.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : स्टार प्लसवरील डान्स रिअलिटी शो नच बलियेच्या लोकप्रिय दिवसेंदिवस भर पडत आहे. या आठवड्यात या शोमध्ये बॉलिवूडचा स्टार कलाकार गोविंदा हजेरी लावणार आहे. या आठवड्यात गोविंदा या शोचा परिक्षक म्हणून काम करताना दिसणार आहे. तसेच त्याच्यासोब त्याची पत्नी सुनीता आहूजा सुद्धा या शोमध्ये दिसणार आहे. नुकताच नच बलियेचा जो टीझर आला तो पाहिल्यावर या आठवड्यात मंचावर असं काहीतरी असं काही घडलं जे ते पाहून मंचावर खूप मोठा धमाका होणार असल्याचं चित्र दिसतंय.

सलमान खानच्या या शोमध्ये रवीना टंडन परिक्षकाच्या भूमिकेत आहे. 90 व्या दशकात रवीना आणि गोविंदा यांची जोडी बॉलिवूडमध्ये खूपच लोकप्रिय होती. यावेळी हे दोघंही नच बलियेच्या मंचावर 90 व्या दशकातील त्यांच्याच लोकप्रिय गाण्यांवर थिरकताना दिसणार आहे. या एपिसोडचा एक प्रोमो रिलीज झाला असून त्याच्या व्हिडिओमध्ये गोविंदा आणि रवीना 'आंखियों से गोली मारे' आणि 'मैं लैला लैला चिल्लाऊंगा' या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.

…म्हणून 2019मध्ये रिलीज होऊनही ‘उरी’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

या व्हिडिओमध्ये गोविंदा रवीनासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत असून त्यांचा डान्स सुरू असतानाच गोविंदाची पत्नीची एंट्री होताना दिसते. ती या दोघांचा डान्स थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र गोविंदा नाराज होत नाही तो दोघींनाही व्यवस्थित सांभाळून घेतो. या एपिसोडमध्ये रवीना आणि गोविंदाची ही जोडी प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असणार आहे. याशिवाय हे दोघंच त्यांची गाणी 'अंखियों से गोली मारे' आणि 'डिस्को में जाएंगे' वर थिरकताना दिसणार आहेत.

खलनायक हूँ मैं... SAAHO च्या सर्व व्हिलन्सचे लुक रिलीज, पाहा फोटो

नच बलियेच्या या सीझनमध्ये मधुरिमा तुली-विशाल सिंह, उर्वशी ढोलकिया-अनुज सचदेव, अनीता हसनंदानी-रोहित रेड्डी, फैसल खान-मुसकान कटारिया या जोड्या सहभागी झाल्या आहेत.

कंगना रणौतचा Dhakad Teaser रिलीज, नेटकरी म्हणाले ही तर...

====================================================================

VIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पुढचे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस

Published by: Megha Jethe
First published: August 10, 2019, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading