नवऱ्याच्या अफेअरमुळे झाला दिया मिर्झाचा घटस्फोट? वाचा काय आहे सत्य

अभिनेत्री दिया मिर्झानं नुकतंच तिचं 11 वर्षांचं नातं तुटल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 05:52 PM IST

नवऱ्याच्या अफेअरमुळे झाला दिया मिर्झाचा घटस्फोट? वाचा काय आहे सत्य

मुंबई, 2 ऑगस्ट : अभिनेत्री दिया मिर्झानं नुकतंच तिचं 11 वर्षांचं नातं तुटल्याचं जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची माहिती दिली. त्यानंतर आता त्यांचं हे नातं तुटण्यामागचं कारण समोर आलं होतं. दियानं घटस्फोट घेण्यामागे पती साहिल संघा याचं अफेअर असल्याचं एका प्रसिद्ध मासिकनं म्हटलं होतं. याशिवाय त्यांनी या व्यक्तीचं नावंही सांगितलं होत. अभिनेत्री कनिका ढिल्लनशी दियाच्या पतीचं अफेअर असल्यानं दियानं घटस्फोटाचं निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता अभिनेत्री कनिका ढिल्लन हिनं मात्र या सर्व केवळ अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त फेटाळलं आहे.

एका प्रसिद्ध मासिकानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिया आणि साहिलचा संसार एक अभिनेत्री आणि लेखिकेमुळे तुटला. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कोणी नाही तर कनिका ढिल्लन आहे असं त्या मासिकाचं म्हणणं होतं. दियाच्या घटस्फोचं वृत्त समेर आल्यानंतर लगेचच कनिकानंही  आपल्या घटस्फोटाचा खुलासा केला. कंगना रणौतचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा ‘जजमेंटल है क्या’ची लेखिका कनिकानं पती प्रकाश कोवेलामुडी यांच्याशी घटस्फोट झाल्याची माहिती दिली. मात्र एकाच दिवशी या दोघंची लग्न तुटण्याच्या बातमी खरंच धक्कादायक होती.

चिमुकलीवर गँगरेप! बलात्काराऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अनुष्काला संताप अनावर

आता ही दोन्ही लग्न एकाच दिवशी तुटण्याचं कनेक्शन जोडल जात होतं. मीडिया रिपोर्ट्सचा असा दावा होता की, साहिल आणि दियाचं नातं तुटण्याचं कारण कनिका आहे. मासिकानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार साहिल आणि कनिकाच्या अफेअरबद्दल दियाला समजलं होतं ज्यानंतर दियानं घटस्फोटाचा निर्णय घेतला. पण आता कनिकानं या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या आहेत तिनं याबाबत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे.

कनिकानं लिहिलं, हास्यस्पद, निरुपयोगी आणि बेजबाबदार! काल्पनिक लिहिणं हे माझं काम आहे तुमचं नाही. दोन व्यक्तींचे घटस्फोट एकाच दिवशी झाल्याचं कारण देऊन तुम्ही अशाप्रकारे त्याचा कनेक्शन जोडू शकत नाही. मी दिया किंवा साहिल यांना अद्याप भेटलेलेही नाही. कृपया हे थांबवा आणि आपापल्या कामाकडे लक्ष द्या. कनिकाच्या या ट्वीटनंतर दिया मिर्झानंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं कनिकाच्या स्पष्टीकरणाबाबत तिचे आभार मानले आहेत.

दिया मिर्झाच नाही तर 'या' बॉलिवूड कलाकारांचेही घटस्फोट ठरले होते धक्कादायक!

दिया मिर्झानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या घटस्फोटाचा खुलासा केला. तिनं लिहिलं, ‘मागच्या 11 वर्षांपासूनचं नातं संपवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही दोघंही एकमेकांच्या सहमतीनं वेगळे होत आहोत. मात्र आमच्यातील मैत्रीचं नातं संपलेलं नाही. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि एकमेकांना पाठिंबा देत राहू. आमचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे आभार त्यांनी आमच्या नात्याला आणि भावनांना समजून घेतलं आणि आमच्या या निर्णयात आमची साथ दिली. त्यामुळे आता आम्ही यावर कोणतीही कमेंट करणार नाही, धन्यवाद’

TMC खासदार नुसरत जहांचे हनिमूनचे PHOTO VIRAL

==========================================================================

पावसाळी सहलीचा प्लान करताय, 'या' धबधब्यावर नक्की जा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...