OMG! दीपिका-कतरिना नाही तर पाकिस्तानमध्ये वर्षभरात सर्वाधिक सर्च झाली बॉलिवूडची ही अभिनेत्री

OMG! दीपिका-कतरिना नाही तर पाकिस्तानमध्ये वर्षभरात सर्वाधिक सर्च झाली बॉलिवूडची ही अभिनेत्री

या अभिनेत्रीचं नाव ऐकूल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : गूगल ट्रेंडनं नुकतीच वेगवेगळ्या देशातील टॉप सर्च पर्सनॅटींची लिस्ट प्रसिद्ध केली. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले. विशेष म्हणजे पाकिस्तानात सर्च केलेल्या टॉप पर्सनॅलिटींमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रीचं नाव वरच्या क्रमांकावर आहे आणि या अभिनेत्रीचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही अभिनेत्री आहे सारा अली खान. हो मागच्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये साराला सर्वात जास्त सर्च केलं गेलं.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिनं 2018 मध्ये रिलीज झालेल्या केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. साराला बॉलिवूडमध्ये येऊन काहीच दिवस झाले असले तरीही तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिचे चाहते फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही आहेत. हा खुलासा झाला तो गूगल ट्रेंडनं प्रसिद्ध केलेल्या टॉप 10 सर्च पर्सनॅलिटीच्या लिस्टमधून.

PM मोदींवरील सिनेमानंतर भन्साळी करणार बालाकोट एअर स्ट्राइकवर सिनेमाची निर्मिती

 

View this post on Instagram

 

The knowledge that makes us cherish innocence makes innocence unattainable.⚠️🚸🐝🍯🐯

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

पाकिस्तानच्या या लिस्टमध्ये फक्त सारा व्यतिरिक्त आणखी दोन भारतीयांचा सामावेश आहे. ही दोन नावं आहेत, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि भारतीय नागरिकता मिळालेला गायक अदनान सामी. साराचं नाव या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. केदारनाथनंतर सारानं रोहित शेट्टीच्या सिंबामध्ये रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर केली. याशिवाय ती लवकरच कार्तिक आर्यन सोबत लव्ह आज काल 2 मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे.

अक्षय कुमारने बायकोला दिले सगळ्यात महागडे झुमके, PHOTO पाहून पोट धरून हसाल

सारा तिच्या फॅशन सेन्स आणि मुलाखतींमुळे जास्त चर्चेत असते. तसेच काही दिवसांपूर्वी ती कार्तिक आर्यनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. ती नेहमी तिच्या मुलाखतीत तिचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसते. सध्या सारा वरुण धवनसोबत कुली नंबर 1 च्या रिमेकचं शूटिंग पूर्ण करत आहे.

 

View this post on Instagram

 

🐰🐰🐰

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

गूगल ट्रेंड 2019 च्या रिपोर्टनुसार पाकिस्तान सर्च केलेल्या टीव्ही शोमध्ये बिग बॉस 13 आणि सिनेमांमध्ये कबीर सिंह यांचा समावेश आहे. कबीर सिंहमध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमानं 250 कोटींचा गल्ला जमवला. तर कलर्स चॅनेलवर प्रसारित होणारा बिग बॉस हा रिअलिटी शो सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे.

रानू मंडलचं ‘तेरी मेरी...’ नाही तर ‘हे’ आहे Google वर सर्वाधिक सर्च केलेलं गाणं

Published by: Megha Jethe
First published: December 13, 2019, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading