बर्थ डे स्पेशल : व्ही. शांताराम यांच्या जन्मदिनी डूडल बनवून गुगलनं वाहिली आदरांजली

आज व्ही. शांताराम यांचा जन्मदिवस आहे. गुगलनंही शांताराम बापूंना आदरांजली वाहिलीये. आज गुगलनं शांताराम यांचं डूडल प्रसिद्ध केलंय. तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला हे डूडल दिसू शकेल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2017 09:55 AM IST

बर्थ डे स्पेशल : व्ही. शांताराम यांच्या जन्मदिनी डूडल बनवून गुगलनं वाहिली आदरांजली

18 नोव्हेंबर : आज व्ही. शांताराम यांचा जन्मदिवस आहे. गुगलनंही शांताराम बापूंना आदरांजली वाहिलीये. आज गुगलनं शांताराम यांचं डूडल प्रसिद्ध केलंय. तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला हे डूडल दिसू शकेल.

शांताराम राजाराम वणकुद्रे असं त्यांचं पूर्ण नाव.. कोल्हापूरमध्ये 1901 मध्ये त्यांचा जन्म झाला.अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार अशी विविधांगी कामं त्यांनी केली. दो आखे बारा हात, पिंजरा, नवरंग, गीत गाया पत्थरों ने, शेजारी, झनक झनक पायल बाजे अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली.1992 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

‘राजकमल’ या निर्मिती संस्थेच्या पंच्याहत्तरीचे निमित्त साधत गुगल डुडल आणि व्ही. शांताराम फांउडेशनतर्फे आजपासून एका अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गुगल डुडल या वेबसाईटवर ‘A Colossus of Indian Cinema’ या लिंकवर व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारलेले व्हर्च्युअल प्रदर्शन आजपासून चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे.

‘गुगल डुडल’ वेबसाईटवर कला आणि संस्कृती नावाचा एक विशेष विभाग आहे. या विभागात शांतारामबापूंना मिळालेले सर्व पुरस्कार, स्टुडिओतील चित्रीकरणाच्या जागा, ध्वनिमुद्रण स्टुडिओ यांची दृश्यफीतही चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच शांतारामबापूंनी दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांची वेगवेगळ्या आकारामधील दुर्मिळ पोस्टर्स आणि छायाचित्रेही या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...