मिर्जा गालिब यांची आज 220वी जयंती, गुगलनं केलं डूडल

मिर्जा गालिब यांची आज 220वी जयंती, गुगलनं केलं डूडल

शेर-ओ-शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. हे निमित्त साधत गूगलने खास डूडल तयार करून मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे.

  • Share this:

27 डिसेंबर : शेर-ओ-शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. हे निमित्त साधत गूगलने खास डूडल तयार करून मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्जा गालिब यांचं पूर्ण चित्र असे अत्यंत मनमोहक या डूडलचे स्वरुप आहे.

27 डिसेंबर 1797ला गालिब यांचा जन्म झाला. त्यावेळी बहादुर शहांचं राज्य होतं. गालिब यांचा जन्म एका सैनिकाच्या घरी झालेला. त्यांना फारसी, उर्दू आणि अरबी भाषा यायच्या.

लहानपणीच गालिब यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलेलं. अगोदर काका आणि नंतर आजी-आजोबांनी गालिबचा सांभाळ केला. गालिब यांचं लग्न वयाच्या 13व्या वर्षी उमराव बेगमसोबत झालेलं. त्याचं अख्खं आयुष्य दिल्लीत गेलं.

First published: December 27, 2017, 10:30 AM IST

ताज्या बातम्या