भाईजान पुन्हा एकदा होणार मामा, सलमानची ही बहीण दुसऱ्यांदा प्रेग्नंट?

भाईजान पुन्हा एकदा होणार मामा, सलमानची ही बहीण दुसऱ्यांदा प्रेग्नंट?

सलमान खानच्या घरी पुन्हा एकदा गुडन्यूज मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अगोदरच्या दोन सिनेमांप्रमाणे हा सिनेमांही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल यात शंका नाही. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याचा भारत हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. सध्या सलमाना हा आनंद सेलिब्रेट करत असतानाच आता त्याला आणखी गोड बातमी मिळाली आहे. सलमानचं घर पुन्हा एकदा आनंदात न्हाऊन निघणार आहे. सलमानची बहीण अर्पिता खान पुन्हा एकदा आई होणार असल्याचं बोललं जात आहे. 4 वर्षांपूर्वी अर्पितानं आयुष शर्माशी लग्न केलं. या दोघांचा अहिल नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Papa’s Day @aaysharma ! Papa the things I make you do no one else can..... thank you for being an amazing papa.♥️ u Ahil.

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

मुंबई मिररनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अर्पिता दुसऱ्यांदा आई बनणार आहे. मात्र अद्याप अर्पिता किंवा आयुष पैकी कोणीही याला दुजोरा दिलेला नाही. सर्वांनाच माहित आहे की, सलमानला लहान मुलांची किती आवड आहे. तो अनेकदा अहिल सोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. याशिवाय अर्पिताच्या इन्स्टाग्रामवरही सलमान आणि अहिलचे काही व्हिडिओ आहेत. अशाच त्यांच्या घरी नवा पाहूणा येत असल्यास सलमान नक्कीच उत्साही असणार आहे.

Bachchan Pandey चं पोस्टर लाँच, हटके लूकमुळे अक्षय कुमार पुन्हा चर्चेत

 

View this post on Instagram

 

Sunday - Funday ! Family Time 😘 Nana & Mamu Loving @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

सलमानच्या सिनेमांच्या सेटवरही अनेकदा अहिल दिसतो. मामा-भाच्याची ही बाँडिग सर्वांनाच माहित आहे. काही दिवसांपूर्वी अर्पितानं तिच्या लग्नातील अनसीन फोटो शेअर केले होते. ज्यावर आयुषनं केलेली कमेंट विशेष गाजली होती. लग्नानंतर 2016 मध्ये अहिलचा जन्म झाला होता. आयुषनं मागील वर्षीच लव्हयात्री या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरीही प्रेक्षकांनी आयुषची दखल मात्र घेतली. त्यानंतर त्याच्याकडे काही सिनेमांच्या ऑफर आहेत मात्र त्याच्या अनाउंसमेंट अद्याप झालेल्या नाही.

वाऱ्याचा वेग वाढला आणि शिल्पा शेट्टीची झाली फजिती, शेअर केला VIDEO

धोनीच्या या बेस्ट फ्रेंडला जायचंय पाकिस्तानात, इम्रान खान यांना म्हणाली...

========================================================

VIDEO: कारगिल विजय दिवस: द्रासमध्ये शहिदांना आदरांजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 02:55 PM IST

ताज्या बातम्या