Good Newwz ने उडवली अक्षय-करिनाची झोप, पाहा Trailer

Good Newwz ने उडवली अक्षय-करिनाची झोप, पाहा Trailer

असं काय झालं की गुड न्यूजमुळे आनंद होण्याऐवजी अक्षय-करिनाची झोपच उडाली... जाणून घेण्यासाठी ट्रेलर शेवटपर्यंत पाहा

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : अक्षय कुमारच्या सिनेमांचा धडाका यंदाच्या वर्षी सुरूच आहे. 'केसरी', 'मिशन मंगल', 'हाउसफुल 4' नंतर आता त्याच्या ‘गुड न्यूज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं ज्यात अक्षय कुमार दोन गरोदर बायकांच्यामध्ये फसलेला दिसला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा मजेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये अक्षय-करिना आणि कियारा-दिलजीत या दोन जोडप्यांच्या सारख्याच आडनावामुळे प्रेग्नन्सीमधील झालेला गोंधळ पाहायला मिळत आहे.

अक्षय-करिना एक असं जोडपं बाळाला जन्म देण्यासाठी IVF तंत्रज्ञानाची मदत घेतात. दुसरीकडे कियारा-दिलजीत यांनीही याच तंत्रज्ञनाची मदत त्याच हॉस्पिलटमध्ये, त्याच डॉक्टरकडे  घेतलेली असते आणि योगायोग असा की या दोन्ही जोडप्यांचं आडनाव एकच असतं. दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांच्या स्पर्मची अदलाबदल होते आणि त्यानंतर या दोन्ही जोडप्यांमध्ये प्रचंड गोंधड उडतो. पण दोन्ही जोडप्यांमधील भिन्न स्वभावामुळे अक्षय आणि करिनाची तर या गुड न्यूजमुळे झोपच उडते. त्यानंतर पुढे काय होतं? ही समस्या ते कशी सोडवतात? या सगळ्याची उत्तरं सिनेमागृहातच मिळणार आहेत.

या सिनेमात अक्षय-करिना ही जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार आहे. धम्माल कॉमेडीसह काहीसा भावनिक असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनात या सिनेमाविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. या ट्रेलरवर युजर्सच्या धमाल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या 27 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

काजोल-अजय 12 वर्षींनी दिसणार एकत्र, ‘तानाजी’मधील तिचा First Look रिलीज

9 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय करिना

अक्षय कुमार आणि करिना कपूर या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम करणार आहेत. याआधी 2009 मध्ये या दोघांनी कमबख्त इश्क या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता ते दोघं पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात कियारा अडवाणी आणि दिलजित दोसांज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे.

आदित्य रॉय कपूरला बर्थडे विश करण्यासाठी दीपिका-रणबीरनं घेतले पैसे? पाहा VIDEO

रानू मंडलचा मेकओव्हर PHOTO VIRAL, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

===========================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 01:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading