मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Good News : लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली दिया मिर्झा; बाळाचा पहिला PHOTO केला शेअर

Good News : लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली दिया मिर्झा; बाळाचा पहिला PHOTO केला शेअर

अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच आई झाली आहे. 9 महिन्यांच्या आधीच तिच्या बाळाचा जन्म झाला होता.

अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच आई झाली आहे. 9 महिन्यांच्या आधीच तिच्या बाळाचा जन्म झाला होता.

अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच आई झाली आहे. 9 महिन्यांच्या आधीच तिच्या बाळाचा जन्म झाला होता.

  • Published by:  News Digital

मुंबई 14 जुलै : अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) नुकतीच आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा विवाह देखील झाला होता. तर त्यानंतर तिने आपण आई णार असल्याची बातमी दिली होती. दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) दुसरं लग्न केलं होतं.

दिया आणि वैभव यांना पुत्ररत्न झालं आहे. तर त्याचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे दियाच्या बाळाचा जन्म 14 मेलाच झाला होता. कारण ते बाळ 9 महिन्यांआधीच जन्माला आलं होतं. तर ते प्रेमॅच्युअर बेबी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली होतं. तर आता दियाने ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

डॉक्टरची तुरुंगातून झाली सुटका; 'देवमाणूस' मालिकेत नवं वळणं

दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही बातमी दिली. त्यात तिने तिच्या मुलाचं नावही जाहीर केलं आहे. तसेच ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा त्यांना आधार मिळाला त्यांचे ही आभार मानले आहे. व आपला आनंद शेअर केला आहे. तर अजूनही आपलं बाळ आयसीयुमध्ये असल्याचंही तिने म्हटलं. (Dia Mirza new born baby)

दियाने तिच्या मुलाच नाव अव्ह्यान आझाद रेखी (Avvyan Azaad Rekhi) असं ठेवलं आहे. दरम्यान दिया गर्भवती असताना तिला काही इन्फेक्शन झालं त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. जे तिच्या जीवावरही बेतू शकलं असतं असं दियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण वेळवर डॉक्टरांनी उपचार करत सिझरिंग (C - section) पद्धतीने बाळाला जन्म दिला. त्यामुळे 6 व्या महिन्यातच बाळ जन्माला आलं.

'पवित्र रिश्ता 2' मुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे; सुशांतच्या चाहत्यांनी केली बायकॉटची मागणी

दियाने आणखी मोठी पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान दिया आणि वैभव यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी विवाह केला होता.

First published:

Tags: Bollywood, Entertainment