नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : जर तुम्ही 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chasmah) या मालिकेचे जबरदस्त फॅन असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. तुम्ही लवकरच या मालिकेत दयाबेनला (Dayaben) गरबा खेळता पाहून शकता. दयाबेन या मालिकेतील सर्वात जास्त पसंत केलं जाणारं पात्र आहे. दयाबेन काही वर्षांपासून मालिकेच्या बाहेर होती. मात्र आता ती पुन्हा एकदा गोकुळधाम सोसायटीत येत आहे. ही बातमी स्वत: दयाबेनचा भाऊ सुंदरने आपल्या जीजाजी जेठालालला दिली आहे.
चाहत्यांचा आनंद द्विगुणित
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chasmah) ही मालिका घरा-घरात पाहिली जाते. TRP चार्टमध्ये हा शो कायम टॉप पाचमध्ये असतो. आता मालिकेच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दयाबेन या मालिकेतून गायब होती. प्रेक्षक दयाबेनच्या येण्याची प्रतीक्षा करीत होते. आणि या दरम्यान दयाबेनचा भाऊ सुंदरलालने तिच्या येण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. ही बातमी ऐकताच चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
हे ही वाचा-Good News : 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; 700 कोटींच्या बोनसची घोषणा
मालिकेच्या एका एपिसोडमध्ये सुंदरलाल आपल्या जीजाजींच्या घरी पोहोचतो आणि दयाबेन येणार असल्याची बातमी घेऊन येतो. सुंदरलाल जेठालालला सांगतो की, त्याने नवीन रियल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला आहे. याशिवाय तो जेठालालला दयाबेनने लिहिलेलं पत्रही देतो. ज्यामध्ये ती परतणार असल्याची बाब नक्की होते. दयाबेन येणार असल्याचं ऐकताच जेठालाल भावुक होतो व आनंदाने नाचू लागतो. दयाबेन पुन्हा मालिकेत दिसणार ही बाब केवळ जेठालालसाठीच नाही तर सर्व चाहत्यासाठी आनंदाची आहे.
दयाबेनचा पसंती वाढतेय
अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) मालिकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. याचं उदाहरण म्हणजे दिशा वकानी मालिकेत नव्हती त्यावेळी निर्मात्यांनी तिच्या जागी दुसरं कोणालाही घेतलं नाही. गोकुळधाममधील संपूर्ण महिलांमध्ये दिशा वकानी सर्वाधित फी घेते. केवळ महिलाच नाही तर येथे प्रत्येक कलाकारापेक्षा दिशा वकानी अधिक पैसे घेते.
म्हणून घेतला होता ब्रेक
दयाबेनचं हसणं आणि डायलॉग डिलीव्हरीमुळे (Dialogue Delivery) प्रेक्षकांचं मनोरंजन होत आलं आहे. प्रेक्षकांमध्ये तिची भूमिका खूप प्रसिद्ध आहे. दयाबेनची भूमिका निभावणारी दिशा वकानीने आपल्या अनोख्या अंदाजामुळे ही भूमिका लोकांच्या ह्रदयाजवळ पोहोचवली आहे. मात्र आई झाल्यानंतर तिने शो ला अलविदा म्हटलं होतं. तीन वर्षांनंतर दयाबेन मालिकेत परतणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Serial, Taarak mehta ka ooltah chashma, Tv celebrities