'गोलमाल अगेन' झाला मालामाल, पार केला 100 कोटींचा टप्पा

'गोलमाल अगेन' झाला मालामाल, पार केला 100 कोटींचा टप्पा

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल अगेन' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी कलेक्शनचा टप्पा पार केलाय. या सिनेमाने पहिल्या चार दिवसांमध्येच 102 कोटींचा गल्ला वसूल केलाय.

  • Share this:

25 आॅक्टोबर : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल अगेन' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी कलेक्शनचा टप्पा पार केलाय. या सिनेमाने पहिल्या चार दिवसांमध्येच 102 कोटींचा गल्ला वसूल केलाय. अजय देवगण, अर्षद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर आणि परिणिती चोप्रा यांची धम्माल कॉमेडी असणाऱ्या या सिनेमाला सर्वत्र प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जर आणखी काही दिवस अशीच धम्माल केली तर 'गोलमाल अगेन' 'बाहुबली' सिनेमाचा रेकॉर्ड तोडू शकते.

अस बघायला गेल तर या सिनेमाच्या तुलनेच आमिरचा 'सीक्रेट सुपरस्टार' काहीसा मागे पडलाय. त्यामुळे आता हा सिनेमा अजून किती विक्रमी कमाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शच्या म्हणण्याप्रमाणे रविवारी 22 आॅक्टोबरला सिनेमानं 8 कोटी 50 लाख रुपये कमावले. एकूण रविवारपर्यंत बाॅक्स आॅफिसवर 31.31 कोटी जमले होते. सिनेमा 200 कोटींपर्यंत जाऊ शकतो,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 11:19 AM IST

ताज्या बातम्या