मुंबई, 02 जानेवारी : 1 जानेवारीला सोनाली बेंद्रेच्या घरी जोरदार पार्टी झाली. त्याला बाॅलिवूडमधले तिचे फ्रेंडस् उपस्थित होते. हृतिक रोशन, सुझान, करण जोहर, मलायका, अर्जुन कपूर असे बरेच. कारणंही दोन होती. एक तर नव्या वर्षाचं स्वागत आणि दुसरा सोनालीचा 44वा वाढदिवस.
सोनाली बेंद्रेच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती गोल्डी बहलनं एक भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिलीय. तो लिहितो, ' हॅपी बर्थडे सोनाली. लोक म्हणतात तुमचा जोडीदार तुमचा बेस्ट फ्रेंड व्हायला हवा. तुमची ताकद व्हायला हवा. तुमची प्रेरणा हवी. तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. 2018 तुझ्यासाठी खूप कठीण गेलं. पण तू धाडसानं त्याच्याशी सामना केलास. मला तुझा अभिमान वाटतो. तू फक्त मलाच नाही तर तुला जे फाॅलो करतात, त्यांना ताकद दिलीस. तू जी काही आहेस त्याबद्दल धन्यवाद.'
बरेच महिने सोनाली न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेत होती. काही दिवसांपूर्वी ती भारतात परतली, तेव्हा तिचे फँन्स खूश झाले.
सोनालीनं 2002मध्ये गोल्डी बहलशी लग्न केलं. लग्नाच्या वाढदिवशी तिनं एक इमोशनल पोस्ट लिहिलेली. तिनं लिहिलं होतं, मी धन्यवाद म्हणणं खूप छोटं ठरेल. जो तुमचाच हिस्सा असतो, त्याबद्दल काय लिहायचं?
न्यू इयर पार्टीतले जॅकलीनचे हाॅट Photo व्हायरल