मुंबई, 02 जानेवारी: जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) हे मराठी चित्रपटसृष्टीतलं आदराने घेतलं जाणारं नाव. जितेंद्र जोशी एक उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो उत्तम कवी आणि चांगला सूत्रसंचालक आहे. नाटक, सीरिअल, वेब सीरिज आणि सिनेमा अशा सगळ्या माध्यमातून त्याने काम केलं आहे. जितेंद्र जोशीने आता एक नवं पाऊल टाकलं आहे. त्याने निर्मिती केलेला पहिला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गोदावरी (Godavari) असे जितूच्या सिनेमाचं नाव आहे. गोदावरीचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
तुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी.. गोदावरी.. असं लिहीत त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीझर शेअर केला आहे. यूट्यूबवरही गोदावरी सिनेमाच्या टीझरला तुफान प्रसिद्धी मिळत आहे. 1 मे 2021 रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गोदावरी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जितेंद्र जोशीसोबतच नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, विक्रम गोखले आणि संजय मोने असे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शनाची धुरा निखील महाजन सांभाळतील तर संवाद प्राजक्त देशमुख यांचे आहेत. या चित्रपटातील गाणी स्वत: जितेंद्रनी लिहीली आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
गोदावरी सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी एक कौटुंबिक चित्रपट मराठीमध्ये येत आहे. गोदावरीच्या तीराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबाची कहाणी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment