सुशांतसाठी केली जातेय जगभरातून प्रार्थना, #GlobalPrayersForSSR ट्विटरवर ट्रेंड

सुशांतसाठी केली जातेय जगभरातून प्रार्थना, #GlobalPrayersForSSR ट्विटरवर ट्रेंड

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला (Sushant Singh Rajput Death) शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले. आज 15 ऑगस्ट रोजी त्याच्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला (Sushant Singh Rajput Death) शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले. आज 15 ऑगस्ट रोजी त्याच्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे. सुशांतच्या केसमध्ये रोज नवे खुलासे समोर येत आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने (Shweta Singh Kirti) स्वातंत्रदिनाच्या दिवशी एकत्र येण्याचे आणि सामुहिक स्वरुपात दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना (Global Prayers For SSR) करण्याचे आवाहन केले होते. सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सकाळी 10 वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी ट्विटर वर #GlobalPrayersForSSR ट्रेंड करत आहे.

सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मुख्य आरोप असणारी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या रियाने सर्वोच्च न्यायालयात याचाच विरोध केला आहे. दरम्यान अभिनेत्याच्या बहिणीने या प्रकरणात #CBIforSSR ची मागणी करत शनिवारी ग्लोबल प्रेयरचे आयोजन केले आहे. अनेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान सुशांतच्या बहिणीबरोबरच कंगना रणौत, त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, क्रिती सॅनन, वरुण धवन, परिणीती चौप्रा, सिद्धार्थ चतुर्वेदी, मौनी रॉय, जरीन खान, शेखर कपूर इ. या कलाकारांनी देखील सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

First published: August 15, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या